सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप…

⚡बांदा ता.१८-: शिक्षणाशिवाय माणसाच्या जीवनात यश संपादन करणे कठीण असते. माणूस शिक्षणाने समृद्ध होतो. म्हणूनच कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी गरजू व होतकरु विद्यार्थ्याना सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक ५० विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात अपडेट राहणे आवश्यक आहे. शिक्षणासोबत कलेला पण प्राधान्य दिले पाहीजे. आपली आवड लक्षात घेऊन ध्येय निश्चित केल्यास यश नक्की मिळु शकेल असे संस्थाध्यक्ष रुपेश परब यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. भविष्यात संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करण्यात येणार आहे.
 यावेळी सरपंच समिर परब, स्कुल कमिटी अध्यक्ष आत्माराम परब, संस्थेचे कार्याध्यक्ष विलास राऊळ, उपाध्यक्ष राजेश सावंत, कोनशी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश जाधव, सरमळे मुख्याध्यापिका श्रीमती गावडे, दिपक गवस, अथर्व देसाई, दिशिका परब आदी उपस्थित होते. मुख्याद्यापक श्रीमती कोठावळे, श्री ढवळी, श्री कुंभार, दिपक करंदीकर, संतोष सावंत, निखिल सावंत, श्रीराम ढवळे, कमलाकर धुरी, बाळा धावडे, तुकाराम राळे यांचे सहकार्य लाभले.
You cannot copy content of this page