निगुडे येथील सिताराम चव्हाण यांचे कोल्हापूर येथे अपघाती निधन…!

⚡बांदा ता.१८-: सावंतवाडी तालुक्यातील निगुडे येथील सिताराम उर्फ बाबल सदाशिव चव्हाण (वय ५५) यांचे कोल्हापूर-शिरगाव येथे ट्रकने धडक दिल्याने जागीच निधन झाले. ही घटना सोमवारी (ता. १६) सकाळी घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापूर येथून निगुडे येथे गावी यायला निघाले होते. बसस्थानकाच्या दिशेने रस्त्याच्या कडेने चालत जात असताना भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सिताराम यांना तेथील स्थानिकांनी तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह कोल्हापुरहून निगुडे गावी आणून निगुडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निगुडे गावचे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी हळहळ व्यक्त केली.
अत्यंत खडतर परिस्थितीत बालपण गेलेले सिताराम यांनी कोल्हापूर शिरगाव येथे एका खासगी कारखान्यात नोकरी स्वीकारली होती. मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वाना आपलेसे करीत असत. त्यांच्या अपघाती निधनाने निगुडे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सून, बहिणी, भावोजी असा परिवार आहे.
फोटो :-
पासपोर्ट.

You cannot copy content of this page