भाजपच्य ममता धुरी यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष..
⚡कुडाळ ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कुडाळ आगारातील जुने बसस्थानक या ठिकाणी असलेल्या गैरसोयीकडे भाजपच्या माजी महिला शहर अध्यक्ष ममता चेतन धुरी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले आहे.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात ममता धूरी यांनी म्हटले आहे, कुडाळ बसस्थानकात चौकशीसाठी अधिकृत दूरध्वनी नाही. तसेच बैठक व्यवस्थेपासून जवळ असलेल्या सुलभ शौचालयाची दुर्गंधी पूर्ण बसस्थानकारत पसरत असून त्यापासून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. सुरक्षितेतेसाठी बसलेल्या पोलीसांसाठी बसण्याची व्यवस्था (चौकी) नाही. हिरकणी कक्षामध्ये बैठक व्यवस्था नाही. बसस्थानकामध्ये वाढत्या चोऱ्यांचा विचार करता सुरक्षितेच्च्यादृष्टीने सीसीटीव्हीची व्यवस्था नाही. बसस्थानकामध्ये अनधिकृत पार्कीगमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सदर मुद्दयांचा विचार करुन लवकरात लवकर प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी सौ. धुरी यांनी केली आहे.
