अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड..
कुडाळ : सरस्वती विद्यालय, इचलकरंजी येथे २९ ऑगस्ट रोजी झालेल्या विभाग स्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यामध्ये कुडाळ हायस्कूलच्या कु. निधी भास्कर सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला. दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी अमरावती येथे होणा-या राज्यस्तर स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेसाठी पाच जिल्हयातील स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा विषय कृत्रिम बुध्दिमत्ता संभाव्यता व आवाहने असा होता, या स्पर्धेचे स्वरुप लेखी चाचणी, त्यानंतर वक्तृत्व आणि शेवटी त्या वक्तृत्वावर आधारीत तोंडी प्रश्न असे त्रिस्तरीय आहे.
या स्पर्धेसाठी तिला प्रशालेचे विज्ञान शिक्षक योगानंद मनोहर सामंत यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या उल्लेखनीय यशाबददल तिचे संस्थेचे उपकार्याध्यक्ष शिरसाट सर, सरकार्यवाह अनंत वैद्य सर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चव्हाण सर, मुख्याध्यापक दिनेश आजगांवकर, उपमुख्याध्यापक महेश ठाकूर व पी. बी. कदम, पर्यवेक्षक प्रविण भोगटे व रंजन तेली आदिनी अभिनंदन केले आहे.
