वीकेंड लॉकडाऊनमध्ये २५० होमगार्ड बजावतायत महत्वाची भूमिका…

३० एप्रिल पर्यंत देणार सेवा

मालवण : (प्रतिनिधी) ‘विकेंड लॉकडाऊन’ आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचारबंदी काळात सेवा बजावण्यासाठी जिल्हा समादेश होमगार्ड यांनी जिल्ह्यात २५० होमगार्डस पोलिसांना अतिरिक्त मदत म्हणून पुरविले आहेत. १० एप्रिलपासून होमगार्ड नेमलेल्या पोलीस ठाण्याच्या बंदोबस्त ठिकाणी हजर झाले. ३० एप्रिलपर्यंत होमगार्ड बंदोबस्त तैनात असणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे पोलीस दिवसरात्र सेवा बजावत आहेत. त्यामुळे त्यांना तणावापासून दिलासा देण्यासाठी होमगार्डची मदत घेतली जात आहे. विकेंड लॉकडाऊन आणि ब्रेक दि चेनच्या पार्श्वभूमीवर होमगार्डसचा फौजफाटा पुरवण्यात आल्याने पोलिसांवरचा ताण काहीसा कमी होण्यास मदत होणार आहे.  जिल्हा समादेश होमगार्ड यांनी कोरोना प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांना अतिरिक्त मदत म्हणून २५० होमगार्ड पुरविण्याचे आदेश तालुका समादेश यांना दिले. जिल्ह्यातील १३ पोलीस ठाण्यात होमगार्ड १० एप्रिलपासून हजर झाले. ५० वर्षाखालील व शारीरिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या २०० पुरुष व ५० महिला होमगार्ड यांची कर्तव्यावर नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांना अतिरिक्त मदत म्हणून दोडामार्ग १८, बांदा १५, सावंतवाडी ३१, वेंगुर्ला १४, कुडाळ ३०, मालवण २५, कणकवली ३१, निवती १०, सिंधुदुर्गनगरी १७, आचरा १०, विजयदुर्ग १०, वैभववाडी २०, देवगड १९ होमगार्ड असे मिळून २५० होमगार्ड पुरविण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page