सावंतवाडी ता.०२-: माजी आमदार परशुराम उर्फ जीजि उपरकर यांनी आज श्रावण मास सप्तमी निमित्त सावंतवाडी येथील श्री देव पाटेकर तसेच दोडामार्ग तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथाचे दर्शन घेतले .
सावंतवाडी पाटेकर मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेले माजी आमदार शिवराम दळवी देखील उपस्थित होते. त्यामुळे तेथे जीजि उपरकर आणि शिवराम दळवी यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या व जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी त्यांच्यासमवेत सामाजिक कार्यकर्ते तसेच जीजि उपरकर समर्थक आशिष सुभेदार , संतोष सावंत , आबा चिपकर , राजेश टंगसाळे , सुरेंद्र कोठावळे , अभय देसाई आदी उपस्थित होते.
