विशाल परब यांनी शिरशिंगे येथील आजारी युवकाला केली आर्थिक मदत…

⚡सावंतवाडी ता.०२-: शिरशिंगे येथील एका गरीब कुटुंबातील ४२ वर्षीय युवक किडनीच्या दुर्धर आजाराने मागील चार वर्षे त्रस्त आहे. तपासणीत त्याच्या आजाराचे निदान झाले आणि डॉक्टरांनी तातडीने किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला आहे. सदर युवकाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या साडेसात लाख रुपयाच्या खर्चासाठी त्याच्या कुटुंबियांनी समाजातील दानशूर आणि सहृदय व्यक्तींना त्याच्यासाठी मदतीचे आवाहन केले होते.

शिरशिंगे गावातील भाजपा कार्यकर्ते, कलंबिस्त शक्ती केंद्रप्रमुख संदीप राऊळ, सरपंच दीपक राऊळ यांच्या माध्यमातून संतोष राऊळ यांच्यावरील प्रसंगाची माहिती समजतात भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी तातडीने श्री संतोष राऊळ यांच्या मदतीसाठी आर्थिक हातभार लावला आहे. आपल्या गावातील एका युवकाच्या मदतीसाठी शिरशिंगे ग्रामस्थांच्या एकीचे आणि शर्थीच्या प्रयत्नांचे त्यांनी मनापासून कौतुक करत संतोष राऊळ या आजारातून व्यवस्थित बाहेर पडतील असा आशावाद व्यक्त केला आहे. यावेळी ॲड अनिल निरवडेकर, मनोज उगवेकर, माजी सरपंच, समीर कांबळी, सरपंच, श्री राहुल गावडे , शिरशिंगे सरपंच श्री दीपक राऊळ,
संदीप राऊळ कलंबिस्त शक्ती केंद्रप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page