कुडाळ मध्ये महिला मेळाव्याचे आयोजन:मीना कांबळी आणि तृष्णा विश्वासराव यांची उपस्थिती..
⚡कुडाळ ता.३१-: शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रमात आरवी शिंदे पैठणीच्या मानकरी ठरल्या
शिवसेना महिला आघाडी कोकण संपर्क प्रमुख मीना कांबळी,शिवसेना उपनेत्या तृष्णा विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती वर्षा कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला मेळाव्यासह महिलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने खेळ पैठणीसह ,हळदी कुंकू,महिलांची फुगडी आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या दिमाखात कुडाळ येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश प्रतिमा, सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलीत करून करण्यात आले. खेळ पैठणीचा या स्पर्धेसाठी महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत द्वितीय क्रमांक -: ममता झोरे, तृतीय क्रमांक -: दिपाली खानविलकर यांनी मिळविला. सर्वांना मानाची पैठण देण्यात आली. विजेत्या व उपविजेत्या महिलांचे उपस्थित महिला आघाडी पदाधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले. या सोहळ्याचे बहारदार निवेदन उमेश परब यांनी केले यावेळी शिवसेना शिवसेना महिला आघाडी कोकण संपर्क प्रमुख मीना कांबळी,शिवसेना उपनेत्या तृष्णा विश्वासराव शिवसेना महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर शिवसेना जिल्हा संघटक श्री.रूपेश पावसकर उपजिल्हाप्रमुख श्री.विश्वास गावकर,तालुकाप्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर,अरविंद करलकर,शिवसेना विभागप्रमुख जयदीप तुळसकर,विभागप्रमुख कमलकांत पारकर, उपतालुकाप्रमुख अरुण तोडणकर,उपविभागप्रमुख गिरीश बेलुसे, शाखाप्रमुख नारूर विठ्ठल शिंदे युवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर,शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे,सरिता राऊत,शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख दीक्षा सावंत,सिद्धी शिरसाट,मालवण महिला आघाडी तालुकाप्रमुख आशा वळप्पी,प्रिया टेंबकर,शोभा बागवे,शितल सावंत,शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर,शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख देवयानी एकावडे बोर्डवे,संगीता खांडेकर,वैष्णवी शिंदे महिला आघाडी विभागप्रमुख दीक्षा एकावडे बोर्डवे ,कळसुली उपविभागप्रमुख वैशाली जाधव,बोर्डवे शाखाप्रमुख पूजा भिसे,उपशाखाप्रमुख बोर्डवे रश्मी परब शिवसेना महिला आघाडी तेंडोली विभागप्रमुख शुभांगी तेंडोलकर,सौरवी चव्हाण आराध्या करलकर, शुभांगी तेंडोलकर तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या शिवसेना महिला आघाडी कुडाळ मालवण तसेच कणकवली देवगड वैभववाडी या पाच तालुक्यातील महिला आघाडी पदाधिकारी यांच्या विशेष मेहनतीने कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले.
