अपघातात गहाळ झालेला मोबाईल केला पोलिसांच्या स्वाधीन; सर्व स्तरातून होत आहे कौतुक..
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यातील माधवराव पवार विद्यालय कोकिसरेचे दहावीतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा अपघातात गाळ झालेला फोन केला वैभववाडी पोलिसांच्या स्वाधीन त्यामुळे त्याचे सर्वत्र होते कौतुक.
कोकिसरे माधवराव पवार विद्यालय येथील दहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी समाधान संतोष सुतार याला घराकडून शाळेला चालत येत असताना कुसूर येथे काही दिवसापूर्वी विजापूर कुडाळ एसटी बसचा अपघात झाला होता या अपघातात अपघात ग्रस्त प्रवाशाचा मोबाईल घटनास्थळी पडला होता हा विद्यार्थी चालत विद्यालय जात असताना त्याला तो आढळून आला त्यांनी हा मोबाईल वैभववाडी पोलीस ठाण्याचे ठाणे हवालदार श्रीमती माधुरी अडुळकर यांच्याजवळ जमा केला त्यामुळे या विद्यार्थ्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिवदास कदम शिक्षक स्वप्निल पाटील व संस्था पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांची कौतुक केली.
