बांदा शहरात फ्लॅट फोडला…

सकाळी घटना उघडकीस: पोलीस घटनास्थळी दाखल.

⚡बांदा ता.२९-: मुंबई गोवा महामार्गावर बांदा शहरातील ठाकूर कॉम्प्लेक्स मधील फ्लॅट रात्री फोडून आतील किमती ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत बांदा पोलिसांना कल्पना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. याच परिसरात आठ दिवसांपूर्वी दोनवेळा चोरीचा प्रकार झाला होता. गजबजलेल्या परिसरात चोरीचे प्रकार होत असल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page