⚡मालवण ता.२५-: मराठी आणि मराठीच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या गोव्यातील गोमंतक मराठी अकादमीच्या आमसभा सदस्यपदी श्री अजयराज शरद वराडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे
मराठी आणि मराठीच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या गोव्यातील मराठी पत्रकार, साहित्यिक आणि विचारवंत समुहाच्या “गोमंतक मराठी अकादमी ” या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आल्त पर्वरी बार्देश गोवा येथील संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली या सभेत श्री वराडकर यांची आमसभा सदस्यपदी बिनविरोध निवड झाली श्री वराडकर हे कट्टा मालवणचे सुपुत्र असून ते साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहे तसेच कट्टा येथील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत
गोव्यात मराठी भाषेच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या गोमंतक मराठी अकादमीच्या आमसभा सदस्य पदी निवड झाल्याबद्दल श्री वराडकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
