⚡देवगड ता.२३-: सिंधुदूर्ग जिल्हा जलजीवन कंत्राटदार संघटनेची बैठक गुरुवार २२ ऑगस्ट रोजी हॉटेल रिलॅक्स जानवली येथे संपन्न झाली.या बैठकीला जिल्ह्यातील ‘ जलजीवन मिशन’ योजनेतील सर्व मक्तेदार उपस्थित होते.या बैठकीत नवीन कार्यकारणी निवडण्यात आली यामध्ये अध्यक्ष दिलीप यशवंत सावंत तर सचिव उदय पाटील यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे अध्यक्ष दिलीप यशवंत सावंत, उपाध्यक्ष विलास गवस,सचिव उदय पाटील, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, तालुका प्रतिनिधी सावंतवाडी अभिषेक सावंत, दोडामार्ग विलास गवस, कुडाळ गुरुप्रसाद तवटे,
मालवण सागर माळवदे, वेंगुर्ला संजीव परब, कणकवली सर्वेश दळवी,देवगड प्रसाद कुलकर्णी
सर्वानुमते कमिटी निवडून, मार्गदर्शक म्हणून संदेश उर्फ गोट्या सावंत सल्लागार म्हणून बाबा आंगणे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.
या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मार्गदर्शन केले. जलजीवन कामाच्या समस्या दूर करण्याबाबत या बैठकीत मक्तेदारांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. ग्रामपंचायतने लोकवर्गणी न भरल्यामुळे मक्तेदारांच्या बिलातून लोकवर्गणी कपात करून घेणेत येत आहे याला विरोध करण्याचे ठरविण्यात आले .त्याचप्रमाणे काम केल्यानंतर कामांना निधी येत नाही या विषयावरही चर्चा झाली . तसेच इतर सर्व मुद्द्यावर सकारात्मक चर्चा होऊन येत्या सोमवारी याबाबत कार्यकारी अभियंता व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले .याच बैठकीत जिल्ह्याची जलजीवन कंत्राटदार संघटनेची नवीन कार्यकारणी नेमण्यात आली व सर्वांनी एकजुटीने संघटितपणे उभे राहून मार्ग काढण्याचे ठरले.
या बैठकीला संदेश उर्फ गोट्या सावंत, दिलीप सावंत,बाबा आंगणे, बिपिन कोरगांवकर, उदय पाटील, विलास गवस,गुरु पालकर
,प्रसाद मोरजकर, गुरुप्रसाद तवटे , अभिषेक सावंत व जिल्ह्यातील बहुसंख्य कॉन्ट्रॅक्टर्स उपस्थित होते.या बैठकीत काम निहाय एक हजार रुपये वर्गणी काढून ती राज्य संघटनेकडे जमा करण्याचे ठरले असून सदर रक्कम तालुका प्रतिनिधीकडे लवकरात लवकर जमा करावी असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
जलजीवन मिशन योजनेच्या मक्तेदार कार्यकारणीच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप सावंत सचिवपदी उदय पाटील…
