पंकज पेडणेकर दादा परब यांचा पुनरुच्चार: सुरज परब गावात असतात कधी..? त्यांना ग्रामपंचायत सत्ते बाबत काय माहित..
⚡सावंतवाडी ता.२१-: तळवडे ग्रामपंचायत घोटाळा धडपणामागे शिवसेना पक्षाच्या एका अदृश्य शक्तीचा हात होता असा पुनरुच्चार माजी सभापती पंकज पेडणेकर ग्रामपंचायत सदस्य दादा परब यांनी आज येथे केला.दरम्यान आम्ही गेले वर्षभर हा घोटाळा बाहेर काढला तक्रारी केल्या मग वर्षभर तुम्ही कोठे होता हा घोटाळा दडपणा मागे एका अदृश्य शक्तीचा हात होता हे सिद्ध होत आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला.
काल तळवडे ग्रामपंचायत मध्ये शिवसेना पक्ष नसून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ग्रामपंचायत आहे. असे काल शिवसेनेचे गावातील पदाधिकारी कार्यकर्ते सुरज परब जालिंदर परब आदींनी स्पष्ट केले होते त्याला आज भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
ते पुढे म्हणाले की ही ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा प्रश्नच येत नाही सुरज परब गावात असतात कधी आणि त्यांना ग्रामपंचायत सत्ते बाबत काय माहित आहे.जालिंदर परब यांनी अभ्यास केल्याशिवाय बोलू नये असे दादा परब म्हणाले.
