तळवडे ग्रामपंचायत घोटाळा मागे मोठी शक्ती, त्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायतच बरखास्त करा…

सुरज परब:केसरकर यांच्यावर टीका कराल तर गाठ आमच्याशी…

⚡सावंतवाडी ता.२०-: तळवडे ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आहे त्यामध्ये पाच सदस्य हे भाजपचे आहेत त्यामुळे या तेराही सदस्यांनी हा मोठा घोटाळा केला आहे. हा घोटाळा मागे मोठी त्यांची शक्ती आहे. त्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायतच बरखास्त करावी अशी आमची मागणी सुरज परब यांनी
पत्रकार परिषदेत केली आहे.

यावेळी जालिंदर परब राजेंद्र रेडकर बबन जाधव बाळा सामान दिवाकर गावडे रोहित परब महेश परब सुरज डिचोलकर आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचा एकही सदस्य नाही त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जे आरोप केले जात आहेत ते धंदात खोटे आहेत. जर महायुतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत आम्ही मंत्री दीपक केसरकर आणि खासदार नारायण राणे यांचे नेतृत्व मानत आहोत जर का तुम्ही अशी फूट पाडण्याचा प्रयत्न कराल आणि केसरकर यांच्यावर टीका कराल तर गाठ आमच्याशी आहे आम्ही शिवसेना स्टाईलने तुम्हाला उत्तर देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

तळवडे ग्रामपंचायत मध्ये घोटाळा झाला आहे त्यामुळे ही ग्रामपंचायत बरखास्त करावी आणि चांगल्या लोकांना या ग्रामपंचायत कारभार पाहू दे असे ते म्हणाले

You cannot copy content of this page