संजू परब: त्वरित माफी मागा अन्यथा येणाऱ्या सर्व महायुतीच्या बैठकामध्ये बहिष्कार टाकू..
⚡सावंतवाडी ता.२०-: रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याची रामदास कदम यांची उंची नाही. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत हे वातावरण असंच राहणार आहे. असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज इथे दिला. दरम्यान रामदास कदम यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा यापुढे महायुतीमध्ये भाजपचा काही संबंध राहणार नाही अथवा कोणत्याही निवडणुका यापुढे आम्ही महायुती म्हणून लढवणार नाहीत असा इशारा देखील श्री परब यांनी यावेळी दिला.
ते पुढे म्हणाले रवींद्र चव्हाण हे भाजपचे एक मोठे नेते आहेत. त्यांच्यावर बोलणं म्हणजे भाजपवर बोलण्यासारखा आहे. त्यामुळे याबद्दल रामदास कदम यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा येणाऱ्या महायुतीच्या सर्व बैठकांमध्ये आम्ही बहिष्कार टाकू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत संदीप गावडे सुधीर आरीवडेकर , परीक्षीत मांजरेकर, सचिन साटेलकर, मोहिनी मडगावकर, मेघना साळगावकर, विनोद सावंत, ज्ञानेश्वर सावंत आदी यावेळी उपस्थित होते.
