मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा…

विजेत्यांना मिळणार सोन्या, चांदीची बक्षिसे..

⚡मालवण ता.१७-: मालवणी संस्कृती व वारसा मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन दि.१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यावर्षी ९ वे वर्ष असून स्पर्धेतील विजेत्या महिलांना सोन्या चांदीची आकर्षक बक्षिसे व पैठणी देण्यात येणार आहेत, अशी माहिती मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली.

मालवण फोवकांडा पिंपळ नजीक निवासस्थानी अरविंद मोंडकर यांनी नारळ लढविणे स्पर्धेची माहिती दिली. यावेळी मंडळाचे सदस्य सौं. अमृता मोंडकर, गणेश पाडगावकर, कोळंब सरपंच सौं. सिया धुरी, सौं. ममता तळगावकर, महेश लुडबे, प्रतिभा मोंडकर आदी उपस्थित होते.

नारळ लढविणे स्पर्धेतील विजेत्या महिलांना प्रथम क्रमांक- पैठणी, सोन्याची नथ सोबत दहा लाखाचा विमा, द्वितीय क्रमांक- पैठणी, सोन्याची नथ व सोबत दहा लाखांचा विमा, तृतीय क्रमांक -पैठणी व चांदीची पैंजण, चतुर्थ क्रमांक- पैठणी आणि चांदीचे पैंजण यासोबतच स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या महिलेस ९ ग्रॅम सोन्याचा हार देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारे किंवा स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या महिला भगिनींना सामाजिक संदेश असलेली कूपन देण्यात येणार आहे, तसेच या कुपन मधून लकी ड्रॉ देखील काढण्यात येणार आहे, आणि या लकी ड्रॉ मधून मोबाईल व इतर आकर्षक बक्षीस ही महिलांना देण्यात येणार आहेत, असे अरविंद मोंडकर यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी स्पर्धकांना नारळ मंडळाकडून देण्यात येणार आहेत, तरी जास्तीत जास्त महिला स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी अरविंद मोंडकर-९८९२०५५८२०, गणेश पाडगावकर- ९४२३२१४७४५, स्नेहल मेथर-९७०२६०४७२०, ममता तळगावकर – ९४२०२६०१४१, पल्लवी तारी ९०११०५६३१७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अरविंद मोंडकर यांनी केले.

You cannot copy content of this page