Headlines

बँकयोजनांचा फायदा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी करावा…

मनिष दळवी:सिंधुदुर्ग जिल्हा बँक मळेवाड शाखा एटीएम् सेंटरचा शुभारंभ.. ⚡सिंधुदुर्ग दि.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक, शेतकरी, महिला यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बँकेच्या विविध सेवा सुविधांचा लाभ घेत असतांना त्यांनी जास्तीत जास्त डिजिटल बँकींगच्या पर्यायाचा वापर करणे आवश्यक आहे. महिलांना विविध बँकीग सुविधांचा वापर करत असतांना मार्गदर्शन व्हावे यासाठी जिल्हा बँकेने बँक सखी सारखी सुविधा…

Read More

देवगड जामसंडे शहराचा प्रारूप विकास आराखड्यात लोट्स गार्डन हा नाविन्यपुर्ण प्रकल्प…

⚡देवगड ता.०३-: देवगड जामसंडे शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात २७ नवीन आरक्षणे दर्शविण्यात आली असून न.पं.च्या विशेष सर्वसाधारण सभेत शहराचा हा प्रारूप विकास आराखडा सादर करण्यात आला.आराखड्यामध्ये दलदलीच्या ठिकाणी लोट्स गार्डन हा नाविन्यपुर्ण प्रकल्प करण्याचे दर्शविण्यात आले आहे. देवगड जामसंडे न.पं.ची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी सायंकाळी न.पं.सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, मुख्याधिकारी सुरज कांबळे,…

Read More

समाजसेवक गुरू कल्याणकर यांच्या शिष्टाई नंतर बंद पडलेले घारपी रस्त्याचे काम पुन्हा सुरू…!

⚡बांदा ता.०३-: स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता घारपी मुख्य रस्त्याचे काम अचानकपणे सुरु करण्यात आल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत काम बंद पाडले. याबाबत ग्रामस्थांनी येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांच्याशी संपर्क साधत कैफियत मांडली. कल्याणकर यांनी ग्रामस्थ व ठेकेदार यांची गावात संयुक्त बैठक घेत यशस्वी शिष्टाई करत यावर तोडगा…

Read More

वैभववाडीचे गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांची अंगणवाडी केंद्राला भेट…

⚡वैभववाडी ता.०३-: वैभववाडीचे गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी विद्या मंदिर करुळ जामदारवाडी प्रशाला व अंगणवाडी केंद्राला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुरुजींच्या भूमिकेत आलेल्या बीडीओ साहेबांच्या प्रश्नाला विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. यावेळी श्री जंगले यांनी विद्यार्थ्यांच्या वह्या तपासत दररोज शुध्दलेखन करण्याच्या सूचना दिल्या. जामदारवाडी अंगणवाडीतील चिमुकल्यांनी बीडीओ यांच्यासमोर गाणं सादर केलं.यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, ग्रामपंचायत अधिकारी…

Read More

करूळ गावातील १२ घरकुलांचे थाटात भूमिपूजन …!

⚡वैभववाडी ता.०२-:प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत सोमवारी एकाचदिवशी करूळ गावातील १२ घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, करूळ सरपंच नरेंद्र कोलते यांच्या शुभहस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाळा कदम, माजी सरपंच हिंदुराव पाटील, सह्याद्री जीव रक्षक अध्यक्ष हेमंत पाटील, बबन डकरे, ग्रामपंचायत अधिकारी…

Read More

सावंतवाडीत ख्रिश्चन शांतता समिती सिंधुदुर्ग द्वारे आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.०३-: ख्रिश्चन शांतता समिती सिंधुदुर्ग यांच्याद्वारे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये तब्बल 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले.ख्रिश्चन शांतता समिती तर्फे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात व गरजूंना या समिती तर्फे मदतीचा हात देखील दिला जातो.रक्तदान हे श्रेष्ठदान आहे याची जाणीव ठेवून आज ख्रिश्चन शांतता समिती हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला.या उपक्रमात ख्रिश्चन…

Read More

अज्ञात वाहनाची रस्त्याने चालणाऱ्या बैलाला धडक…

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण राणे यांनी तात्काळ दाखल होऊन केले प्राथमिक उपचार.. कणकवली : सोमवारी पहाटे कणकवली शहरातील शिवाजी चौक येथे अज्ञात वाहनाने बैलाला धडक देऊन जखमी केले. येथून जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांनी त्याला रस्त्याच्या बाजूला केले. ही बातमी त्या परिसरात राहणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण राणे यांना समजताच त्यांनी उपस्थित राहुन त्या बैलावर प्राथमिक उपचार…

Read More

फ्लाय९१च्या तिकीट्स आता पेटीएमवर उपलब्ध…

⚡कुडाळ ता.०३-: गोवा स्थित विमान कंपनी फ्लाय९१च्या तिकीट्स आता पेटीएमवर उपलब्ध झाल्या आहेत. फ्लाय९१ने पेटीएमसोबत भागीदारी करून ऑनलाईन तिकीट सेवांचा विस्तार केला आहे अशी माहिती फ्लाय९१च्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या भागीदारीमुळे फ्लाय९१च्या लाखो प्रवाशांना आता पेटीएमच्या माध्यमातून प्रवासासाठी तिकीट बुक करता येणार आहे.गोवा स्थित फ्लाय९१ आणि पेटीएम ब्रँडची मालकी असलेली नोएडा स्थित वन९७…

Read More

कुडाळ तहसील कार्यालयात सूचना पेटी…

तहसीलदार वीरसिंग वसावे यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.०३-: तहसील कार्यालयात विविध कामांसाठी नागरिक येत असतात. त्यांच्या प्रशासनाबाबत काही सूचना असतात किंवा काही तक्रारी देखील असतात. त्या तक्रारी आणि सूचना नागरिकांना थेट तहसीलदारांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आजपासून तहसीलकार्यालयात सूचना पेटी कार्यान्वित केली आहे. नागरिकांनी त्यांच्या सूचना किंवा तक्रारी काही असतील तर त्या…

Read More

मराठीचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक…

अन्वर खान:नट वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा.. ⚡बांदा ता.०३-: हृदयाला भिडणारी भाषा ही मातृभाषा असते, आणि सर्व भाषात मराठी ही परिपूर्ण भाषा आहे. मराठी भाषा टिकविण्यासाठी ती बोलायला हवी, वाचायला हवी, लिहायला हवी. मराठीचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान यांनी येथे केले. येथील नट…

Read More
You cannot copy content of this page