पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण राणे यांनी तात्काळ दाखल होऊन केले प्राथमिक उपचार..
कणकवली : सोमवारी पहाटे कणकवली शहरातील शिवाजी चौक येथे अज्ञात वाहनाने बैलाला धडक देऊन जखमी केले. येथून जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांनी त्याला रस्त्याच्या बाजूला केले. ही बातमी त्या परिसरात राहणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण राणे यांना समजताच त्यांनी उपस्थित राहुन त्या बैलावर प्राथमिक उपचार केले. या अपघाताची माहिती तात्काळ वामन तर्फे यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि माजी उपनगराध्यक्ष बंडु हर्णे यांना दिली. त्यांनी तात्काळ नगरपंचायत कर्मचारी पाठवतो असे सांगितले. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते वामन तर्फे उपस्थित होते.
