वेंगुर्ला पोलिस ठाणे आणिस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांची जलद कामगिरी
वेंगुर्ला आडारी येथील घरफोडीचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील आडारी-टेंबवाडी येथील रहिवासी मनिषा गुंडराज शिरोडकर (वय ६४) यांच्या बंद असलेल्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सुमारे 31.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेऊन घरातील सामानाची तोडफोड करून साहित्य अस्ताव्यस्त टाकले होते. यामध्ये एकूण 15 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला…
