स्नेहनागरी सहकारी पतसंस्थेच्यारौप्य महोत्सवच शानदार उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२८-: सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव आणि मार्गदर्शक किरण ठाकूर यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या स्नेहनागरी सहकारी पतसंस्थेने नुकतेच आपल्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षात दिमाखात पदार्पण केले. या गौरवशाली निमित्ताने संस्थेवर आणि तिच्या शिस्तबद्ध कारभारावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यवस्थापिका संगीता प्रभू यांच्यासह सर्व कर्मचारी आणि निष्ठावान…

Read More

सावंतवाडी भाजपच्या माध्यमातून आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच औचित्य:जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ७०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग.. ⚡सावंतवाडी ता.२८-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवड्या’चे औचित्य साधून जिल्ह्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुक्यात भाजपच्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ज्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ७०० हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावंतवाडी येथील राणी…

Read More

सामाजीक बांधीलकी जपत, श्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेची शिक्षणासाठी आर्थिक मदत…!

⚡बांदा ता.२८-:“समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि ती तत्वनिष्ठेने करा,” या श्री श्री १०८ महंत मठाधीष प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेचे समाजोपयोगी कार्य उल्लेखनीय ठरत आहे. महाराष्ट्र राज्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, रुग्णांना मदतीचा हात मिळावा आणि गरीब-गरजूंना आधार मिळावा या…

Read More

भाजपच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजित नमो युवा रन च्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡सावंतवाडी ता.२८-: संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो युवा रन चे आयोजन करण्यात आले होते. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांनी यशस्वीरित्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नशामुक्तीचा संदेश देणारी ही मॅरेथॉन होती यावेळी यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा…

Read More

आंबोली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य,उबाठा पक्षाचे कार्यकर्ते यांचा भाजप मध्ये प्रवेश…!

प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश.. ⚡आंबोली ता.२८-: आंबोली ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच उबाठा. पक्षाचे करक्या कार्यकर्ते श्री काशीराम मालू राऊत यांनी आज भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार…

Read More

बांदा येथील साई मठात श्री साई सतचरीत्र चक्रीपारायण भक्तीमय वातावरणात संपन्न…

⚡बांदा ता.२८-: साईभक्त कै. बाप्पा केसरकर संस्थापित बांदा येथील श्री साई मठात सालाबादप्रमाणे यंदाही साईपुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आज सकाळी श्री साई सतचरीत्राचे चक्रीपारायण भक्तीभावाने पार पडले. पहाटे ६.०० वाजता पारायणाला प्रारंभ झाला. सतत पठण व भक्तिगायनाने वातावरण भारावून गेले. सकाळी १०.०० वाजता पारायणाची सांगता करून श्री साईची महाआरती करण्यात…

Read More

ग्रामपंचायत कळसुलीचा अभिनव उपक्रम…

शालेय मुलांना वय-अधिवास दाखल्यांचे वितरण.. कणकवली –तालुक्यातील कळसुली गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेले दाखले मिळवण्यासाठी वारंवार पंचायत कार्यालय किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासू नये, यासाठी ग्रामपंचायत कळसुलीने पुढाकार घेतला. या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रातून एकाच वेळी १२१ विद्यार्थ्यांना वय-अधिवास प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पालक व ग्रामस्थांना मोठा दिलासा…

Read More

सावंतवाडीत २९,३० रोजी भव्य ओपन गरबा नाईट…

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत आणि रोट्रॅक्ट क्लबऑफ सावंतवाडीचे आयोजन.. सावंतवाडी | प्रतिनिधी :सावंतवाडीत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत आणि रोट्रॅक्ट क्लबऑफ सावंतवाडी तर्फे यंदा भव्य ओपन गरबा नाईट चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राणी पार्वतीदेवी हायस्कुल (RPD) हॉल येथे होणार आहे. दिनांक २९ व ३० सप्टेंबर रोजी रात्री या सांस्कृतिक…

Read More

*कोकणात काँक्रिट नव्हे, तर निसर्गसंपन्न पर्यटनाची गरज…

डॉ. अंशू वर्मा:पर्यटन सप्ताहानिमित्त राष्ट्रीय परिसंवाद : कोकणाच्या पर्यटनाला नवी दिशा.. ⚡मालवण ता.२८-:कोकणातील पर्यटन समृद्ध आणि निसर्गसंपन्न आहे. येथे जे आहे, तेच देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खूपच सुंदर आहे. यामुळे येथे काँक्रिटचे जंगल उभे राहू नये, अशी अपेक्षा सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजित पर्यटन सप्ताहानिमित्त राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्‌द्घाटनप्रसंगी राजस्थान विद्यापीठातील प्राध्यापिका आणि प्रसिद्ध गायिका डॉ. अंशू वर्मा…

Read More

मळगाव येथील श्री दुर्गामाता दौडला हिंदूप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

शिवशंभू ग्रुप मळगावच्यावतीने दौडचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२८-: शिवशंभू ग्रुप मळगावच्यावतीने प्रथमच आयोजित केलेल्या मळगाव येथील श्री दुर्गामाता दौडला मळगाव येथील हिंदूप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दौडीत सर्वजण पारंपारिक वेशभूषेत तर विद्यार्थी शालेय वेशभूषेत सहभागी झाले होते.सकाळी ८ वाजता येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या श्री दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. दौडची सुरुवात छत्रपती…

Read More
You cannot copy content of this page