दांडेलीत घुमणार हनुमान जन्मोत्सवाचा जागर…

धार्मिक, कार्यक्रमांसह ‘दिवाळी, पुत्र पुत्रकामेष्टी यज्ञ’ नाटकांची मेजवानी

⚡सावंतवाडी ता.३१-:
हनुमान जन्मोत्सवानिमित्त दांडेली- आरोस बाजार येथे जय हनुमान मित्र मंडळ (2018) तर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त गुरुवार, दि. 2 रोजी सकाळी ११ वाजता श्री हनुमान सहस्त्रनाम याग, त्यानंतर दुपारी 1 वाजता महाआरती, नंतर रात्री 7 वाजता आरोलकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, आरवली यांचा ‘पुत्र कामेष्टी यज्ञ’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. दरम्यान, श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवार, दि. 1 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजता. श्री हनुमान कला क्रीडा मंडळ आरोस-दांडेलीतर्फे परेश नाईक लिखित दिवाळी हा दोन अंकी मालवणी नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन जय हनुमान मित्र मंडळ आरोस – दांडेली व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page