खासदार नारायण राणे वाढदिवस औचित्य..
⚡कुडाळ ता.३१-: सिंधुदुर्ग -दक्षिण रत्नागिरी मतदार संघाचे लोकप्रिय खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त
सिंधुदुर्ग डिस्ट्रीक कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने
भारतीय जनता पार्टी, कुडाळ तालुका आयोजित जिल्हास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. १० एप्रिल २०२६ रोजी महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे ही स्पर्धा होणार आहे.
२०२६ – २७ च्या हंगामातील ही पहिली स्पर्धा असल्यामुळे खेळाडू नोंदणी फी रु. १०० /- प्रत्येक खेळाडूने असोसिएशनला जमा करावयाची आहे. सर्व खेळाडूंची प्रवेश फी आयोजकांमार्फत भरण्यात येणार आहे. सर्व खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व खेळाडूंना सकाळी नाष्ता / चहा व संध्याकाळी स्नॅक्स देण्यात येतील.
पहिल्या ८ क्रमांकांना रोख रकमेची बक्षिसे देण्यात येतील. व्हाईट स्लॅम / ब्लॅक स्लॅमला आकर्षक बक्षिसे. स्पर्धेसाठी नावे नोंदविण्याची अंतिम तारीख ०७ एप्रिल २०२६ आहे.
स्पर्धेसाठी एन्ट्री खालील ठिकाणी स्विकारण्यात येईल. सावंतवाडी- राजेश निर्गुण (7517535028), कुडाळ
शुक्राचार्य म्हाडेश्वर – (9421238518), वेंगुर्ला- ओंकार कुबल (7276523372), कणकवली-अनिल कम्मार (9370588308), देवगड-प्रकाश प्रभू (9423303822), मालवण-संतोष बनसोडे (9423302707).
खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव व लोगो असलेला पांढरा टी शर्ट आणि फूल पॅन्ट घालून खेळणे अनिवार्य आहे.
सुपर सिक्स चॅलेंजर साठीचे बदल पुढील प्रमाणे असतील.
- सामने ८ ऐवजी ६ बोर्डस् चे ३ सेट खेळविण्यात येतील
- अपोनंटची सिंगल पीस डिफेन्स करता येणार नाही.
- स्वतःची सोंगटी किंवा क्वीनला स्ट्राइकरचा स्पर्श करूनच दुसऱ्याची सोंगटी हलवता येईल.
- चुकीच्या पद्धतीने फक्त दुसऱ्याच्या सोंगटीला स्ट्राइकरचा स्पर्श झाल्यास फाऊल होईल. शक्य असल्यास हललेली सोंगटी / सोंगट्या पुन्हा पूर्व स्थितीत ठेवण्यात येतील.
- गेम टाय झाल्यास टायब्रेकर आणि सडन डेथ चा वापर होईल.
स्पर्धा एकाच खुल्या गटात खेळविण्यात येईल. पहिल्या राऊंड पासून ६ बोर्डांचे ३ गेम खेळविण्यात येतील.
जास्तीत जास्त स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अवधूत भणगे व भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
