नावळे येथून तरुणी बेपत्ता…

*💫वैभववाडी दि.२४-:* नावळे गावठाणवाडी येथील तरुणी कणकवली येथे मावशीकडे जाते असे सांगून गेलेली तरुणी परत घरी आली नाही म्हणून तिच्या वडिलांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाली असल्याची फिर्याद दिली आहे. प्राची विनोद गुरव वय 20 असे तिचे नाव आहे.ही घटना 21 जानेवारी रोजी घडली. या घटनेची फिर्याद तिचे वडील विनोद धोंडू गुरव यांनी वैभववाडी…

Read More

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत टोपीवाला मालवण संघाला विजेतेपद…

*मालवण दि.२४-:* सिंधुदुर्गात प्रथमच ओरोस येथे रामा स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित ३ ऑन ३ बास्केटबॉल स्पर्धेत मालवणच्या टोपीवाला ए संघाने सिंधुदुर्गनगरी बी संघाचा पराभव करत विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचे उदघाटन मैदान सेवक मंगेश माने यांच्या हस्ते करण्यात आले. यात टोपीवाला मालवणचे चार व सिंधुदुर्गनगरीचे चार असे आठ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात टोपीवाला ए…

Read More

निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार…

*सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न *💫बांदा दि.२४ -:* सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘मान कर्तृत्वाचा, सन्मान नेतृत्वाचा’ राज्यस्तरीय पुरस्कार मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांना सिंधुदुर्ग जिल्हा भूषण सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर यांच्या…

Read More

पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी मालवण पंचायत समितीला राज्य स्तरावर मानांकन…

*💫मालवण दि.२४-:* केंद्र स्तरावरील पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२१ या पुरस्काराच्या राज्य स्तरासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव असे मालवण पंचायत समितीला नामांकन प्राप्त झाले आहे. उच्चतम गुणांकन प्राप्त पंचायत राज संस्थांच्या राज्यस्तरीय पडताळणी करता राज्यस्तरीय समितीकडून २४ व २५ जानेवारीला मालवण पंचायत समितीची पडताळणी व तपासणी होत आहे. केंद्र स्तरावरील हा पुरस्कार असून या…

Read More

ग्रामसभा आयोजित करा अन्यथा प्रजासत्ताकदिनी उपोषण

तारकर्ली ग्रामस्थांचा इशारा मालवण-: कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेली तारकर्ली ग्रामपंचायतीची ग्रामसभा त्वरित आयोजित करण्यात यावी अन्यथा २६ जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा तारकर्लीचे ग्रामस्थ व श्री साई सेवा समाज कल्याण मंडळ तारकर्लीचे अध्यक्ष भिवाजी कोळंबकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन भिवाजी कोळंबकर यांनी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव…

Read More

*मातोंड येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

*लायन्स क्लब, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, श्री. देवी सातेरी कला क्रीडा मंडळातर्फे आयोजन *💫सावंतवाडी दि.२४-:* लायन्स क्लब सावंतवाडी, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,शाखा -वेंगुर्ला व श्री. देवी सातेरी कला क्रीडा मंडळ मातोंड यांच्या संयुक्त विद्यमाने मातोंड येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ला. अमेय पै यांनी रक्तदान करून एक नवा आदर्श ठेवला….

Read More

दबावाला बळी न पडता ‘त्या’ अधिकाऱ्याची चौकशी निःपक्षपणे व्हावी…

*सावंतवाडी प्रांताधिकारी, तहसीलदारांना देणार निवेदन : काँग्रेसचे बांदा विभागीय अध्यक्ष संदेश भोगले *💫बांदा दि.२४-:* बांदा तलाठी बदनामीप्रकरणी तक्रादाराच्या तक्रारीनुसार संबंधित अधिकाऱ्याची चौकशी सुरू असताना बांदा शहरातील एका विशिष्ट लॉबी कडून त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणे ही मोठी गंभीर बाब आहे. चौकशीत सर्व सत्य बाहेर येईल, त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न आम्ही हाणून…

Read More

युट्युब, व्हॉटस्अॅप, फेसबुकच्या जमान्यात कीर्तनासारखे कार्यक्रम आयोजित करणे हे कौतुकास्पद…

पोलीस निरिक्षक तानाजी मोरे;वेंगुर्ला येथे भव्य कीर्तन महोत्सव उदघाटन *💫वेंगुर्ला दि.२३-:* सध्या युट्युब, व्हॉटस्अॅप, फेसबुकचा जमाना आहे. तरीही कीर्तनासारखे जुने रुढी, परंपरा जपणारे कार्यक्रम आयोजित केले जातात हे खूप कौतुकास्पद असल्याचे मत वेंगुर्ला पलिस निरिक्षक तानाजी मोरे यांनी कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले. वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला व श्रीदेव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या…

Read More

कॅटिलिव्हर फलक लावणारी मालवण पालिका ठरली जिल्ह्यातील पहिली नगरपालिका

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन;शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य मालवण दि प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीचे औचित्य साधून मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात उभारण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शहराचे प्रवेशद्वार असलेल्या मालवण देऊळवाडा येथे करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात नगर पालिका क्षेत्रातील कँटीलिव्हर (कमान स्वरूपात) फलक बसवणारी…

Read More

भुईबावडा बाजारपेठ 5 हजार रुपये किंमतीची देशी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई..

*💫वैभववाडी दि.२३-:* भुईबावडा बाजारपेठेत विनापरवाना बेकायदा देशी दारू विकण्यासाठी बसलेल्या इसमास वैभववाडी पोलिसांनी धाड टाकून पकडला.वैभववाडी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर राहण्याची नोटीस दिली आहे. आरोपी चंद्रकांत शांताराम दळवी वय 63 असे त्याचे नाव आहे.ही घटना 23 जानेवारी रोजी दुपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास घडली. भुईबावडा बाजारपेठेत चंद्रकांत शांताराम दळवी हे 5 हजार 160 रुपये किंमतीची देशी…

Read More
You cannot copy content of this page