काजू दराबाबत सलग दुसऱ्या बैठकीला व्यापारी, कारखानदारांची दांडी..
सावंतवाडी प्रांताधिकारी यानी केले होते आयोजन;काजू दर पाडुन घेण्याचा प्रयत्न:अण्णा केसरकरांचा आरोप सावंतवाडी काजुला योग्य भाव मिळण्यासाठी आज दुसऱ्यांदा येथील प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत व्यापारी कारखानदार पुन्हा एकदा अनुपस्थित राहिले असून, यावरून कारखानदार व व्यापारी यांना शेतकऱ्यांचे हित नको आहे. त्यांना संगनमताने शेतकऱ्यांचा काजू पाडून घेण्याचा डाव आखला असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी…
