माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सावंतवाडीत आगमन

*जिल्हा भाजपचा वतीने करण्यात आले जल्लोषी स्वागत* *💫सावंतवाडी दि.२८-:* राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सावंतवाडी शहरात स्वागत करण्यात आले आहे. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब युवा उद्योजक विशाल परब तसेच भाजपचे जिल्ह्यातील सर्व…

Read More

ग्रा. पं. कर्मचाऱ्यांच जिल्हा परिषद समोर लाक्षणिक उपोषण सुरू..

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रा.पं.कर्मचारी संघटना सिंधुदूर्ग शाखा – सावंतवाङी कङून ग्रा.पं.कर्मचारी यांच्या तक्रारींबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुकाध्यक्ष श्री.हनूमान केदार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषणास सुरुवात झाली आहे.

Read More

*उद्यमनगर येथील भंगार गोडावून ला आग*

*💫सावंतवाडी दि.२८-:* माजगाव उद्यमनगर येथील बांदेकर यांच्या भंगार गोडवून ला आज अचानक मोठी आग लागली असून, या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, भांगरातील साहित्य जळून खाक झाले आहे.परंतु या आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही आहे. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला असून, आग विजवण्यसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Read More

*शिवसेना नगरसेवकांनी आमदार नितेश राणेंची घेतली भेट

*आमचे वाद फक्त व्यासपीठावर -अनारोजीन लोबो* *💫सावंतवाडी दि.२८-:* राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आमदार नितेश राणे सावंतवाडी नगरपालिकेत आले असताना आज सावंतवाडी नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी लोबो यांनी वाद फक्त व्यासपीठावर असतात. यावेळी नगरसेविका अनारोजीन लोबो, भारती मोरे, दिपाली सावंत, शुभांगी सुखी, माधुरी वाडकर आदी…

Read More

परिचारिका नेहा पालव यांचा विविध संघटना कडून सन्मान

*💫सावंतवाडी दि.२८-:* मुंबई महापालिका प्रशासनात शताब्दी हाॅस्पिटल गोवंडी मुंबई येथे ओरोग्य परिचारीका पदावर कार्यरत असलेल्या सौ नेहा नारायण पालव यांना म्युनिसिपल नर्सिंग अँन्ड पॅरामेडिकल स्टाफ युनियन मुंबई तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना आदी संघटनांकडून सन्मानित करण्यात आले आहे. सौ नेहा नारायण पालव या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली,घोलेवाडी येथील रहिवासी रहिवासी असून सध्यस्थित नवीमुंबई येथे कामानिमित्त राहत…

Read More

मालवण-आडारी डम्पिंग ग्राउंडला पुन्हा आग….

मध्यरात्री कणकवली नगरपंचायत अग्निशमन आल्यावर आगीवर नियंत्रण;आग लावली जात असल्याचा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा आरोप ; चौकशीची मागणी *💫मालवण दि.२८-:* नगरपालिकेच्या आडारी डंपिंग ग्राउंड येथे रविवारी रात्री पुन्हा एकदा आग लागली. डम्पिंग ग्राऊंड येथे महिनाभरातील ही आगीची दुसरी घटना आहे.येथील कचऱ्याला लागलेली आग वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर अधिकच भडकत होती. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट परिसरात…

Read More

ब्राह्मण मंडळाच्या दिनदर्शिकेचे राजाराम चिपळुणकर यांच्या हस्ते प्रकाशन

*💫वेंगुर्ला दि.२७-:* वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सिधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजाराम चिपळुणकर यांच्या हस्ते करण्यात आले. सिधुदुर्ग ब्राह्मण मंडळ शाखा वेंगुर्ल्याची सभा येथील साई मंगल डिलक्स हॉल येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अरुण गोगटे, तालुका अध्यक्ष श्रीकांत रानडे, उपाध्यक्ष विद्या नवाथे, खजिनदार श्रीकृष्ण ओगले, कार्यवाह नित्यानंद आठलेकर, सहकार्यवाह जगदीश गोडबोले, सल्लागार चंद्रकांत फाटक,…

Read More

जिल्हा निवड चाचणी शुटिंगबॉल स्पर्धेत आजगाव संघ अजिंक्य

*💫मालवण दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा शुटिंगबॉल असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शुटिंगबॉल असोसिएशन आणि जिल्हा शुटिंगबॉल विकास कमिटी आयोजित व कॉ. ए. बी. वर्धन स्मरणार्थ, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पुरस्कृत जिल्हा शुटिंगबॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत आजगाव (अ) संघाने तरळे (अ) संघाचा १६-१० अशा गुणाने पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. सावंतवाडी येथील आर. पी. डी. हायस्कुलच्या मैदानावर…

Read More

एकुमखी दत्तमंदिरात विविध कार्यक्रम

वेंगुर्ला- वेंगुर्ला-कुबलवाडा येथील एकमुखी दत्तमंदिरात २१ डिसेंबरपासून दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे. २८ डिसेंबरपर्यंत पालखी प्रदक्षिणा होणार आहे.२७ रोजी रात्रौ ७ वा. पालखी, ७.३० वा. रामेश्वर दशावतार मंडळाचे नाटक, २९ रोजी पहाटे काकड आरती, रात्रौ १० वा. दत्तजन्म, त्यानंतर पालखी प्रदक्षिणा, ३० रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद. सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन…

Read More

वाढदिवसाच्या निमित्ताने जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

*💫वेंगुर्ला दि२७-:* जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कोकण इतिहास परिषदचे सदस्य डॉ. संजीव लिंगवत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले महाजनवाडी येथील पंधरा गरीब कुटुंबीयांना जीवनाश्यक वस्तू वितरित करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे सदस्य राजेश खोब्रेकर,सुभाष कदम,भगवान कदम,सिध्देश सावंत,अशोक गोसावी,गणु कदम आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page