आमदार नाईक यांनी स्वतः चेच सत्कार सोहळे करून घेण्यापेक्षा प्रत्यक्षात आरोग्य व्यवस्था सुधारावी…

मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा आमदार वैभव नाईक यांना सल्ला *💫कुडाळ दि.१५-:* गावात गावातील विलगीकरण कक्षांच्या उदघाटनासाठी फिरण्यापेक्षा तसेच कुडाळ-मालवणच्या जनतेला नुसतीच उदघाटने निवेदने आणि स्वतः चेच सत्कार सोहळे करून घेऊन बसण्यापेक्षा आमदार वैभव नाईक यांनी प्रत्यक्षात आरोग्य व्यवस्था सुधारुन जनतेचा त्रास कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे काहीतरी करावे, असा सल्ला मनविसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी…

Read More

…आणि अपघातग्रस्तांच्या मदतीला बाबा सावंत धावले

किर्लोस फाटा येथील अपघातातील मारुती व्हॅन काढली बाहेर *💫कणकवली दि.१५-:* केवळ सामाजिक कार्यकर्ता ही ओळख असून चालत नाही तर सामाजिक काम करावे लागते आणि अडचणीच्या वेळेला कोण मदतीला येऊ शकतो हा विश्वास कमवावा लागतो याचीच प्रचिती किर्लोस गावचे सुपुत्र तथा शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख प्रशांत उर्फ बाबा सावंत यांनी दिली आहे .किर्लोस फाटा येथील अवघड वळणावर…

Read More

इंधन दरवाढीविरोधात सावंतवाडीत धक्का मारो आंदोलन

बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडीचा पुढाकार; तहसीलदार यांना दिले निवेदन *💫सावंतवाडी दि.१५-:* बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी आणि महिला आघाडी तर्फे आज सावंतवाडी शहरात गवळी तिठा ते तहसीलदार कार्यालय पर्यंत गाड्यांना धक्का मारत ” धक्का मारो आंदोलन ” बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल,…

Read More

नारायण राणे यांच्याशी असलेला वैचारिक वाद लढण्यास आम्ही समर्थ आहोत, त्यासाठी शिखंडीची गरज नाही

शिवसेना संघटक बबन बोभाटे यांचा प्रदीप भालेकर यांना टोला *💫कुडाळ दि.१५-:* नारायण राणे यांच्याशी असलेला आमचा वैचारिक वाद लढण्यास आम्ही समर्थ आहोत, त्यासाठी भालेकर यांच्यासारख्या शिखंडीची गरज नाही, असा टोला शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी प्रदीप भालेकर यांना लगावला आहे. बोभाटे म्हणाले, काही माणसे एवढी स्वार्थी असतात की स्वार्थ साधताना त्यांचा इगो दुखावला की सैरभैर…

Read More

मळेवाड- कोंडुरे ग्रामपंचायत समोरील टेलिफोनच्या पोलला अज्ञात वाहनाची धडक…

*💫सावंतवाडी ता.१५-:* मळेवाड- कोंडुरे ग्रामपंचायत समोरील टेलिफोनच्या पोलला सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा पोल जमिनीवर कोसळून टेलिफोनच्या तारा रस्त्यावर पडल्या आहेत. त्यामुळे येथील टेलिफोन सेवा विस्कळीत झाली आहे.

Read More

खारेपाटण मधील ग्रामपंचायतीच्या कोविड केअर सेंटरमधील पहिला रुग्ण झाला बारा

ग्रामस्थानी केले झाडाचे रोपटे देऊन स्वागत *💫कणकवली दि.१५-:* खारेपाटण येथे लोकसहभागातून स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने निर्माण केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी पहिल्या बरा होऊन बाहेर आलेल्या रुग्णाचे खारेपाटण ग्रामस्थांच्यावतीने एक झाडाचे रोपटे तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. खारेपाटण रामेश्वरनगर येथे २५ बेडचे सुसूज्ज कोविड केअर सेंटर काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आले होते….

Read More

कणकवली पोलिसांची गोवा बनावट दारू विरोधात धडक कारवाई

ओसरगांव येथे दोन लाख ६४ हजाराची पकडली दारू साडे दहा लाखांवर पकडला मुद्देमाल *💫कणकवली दि.१५-:* गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणारी गोवा बनावटीच्या 2 लाख 64 हजार रुपयांच्या दारुसह 8 लाखाचा ट्रक असा एकूण 10 लाख 64 हजारांचा मुद्देमाल कणकवली पोलिसांनी जप्त केला आहे. नॅशनल हायवेवर ओसरगाव टोलनाक्याजवळ 14 जून रोजी रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी ही…

Read More

मळेवाड विलगिकरण मधील रुग्णाना अंडी वाटप

राज ठाकरेंच्या वाढदिनी मनसेचा उपक्रम *💫सावंतवाडी ता.दि.१५-:* मळेवाड येथील गाव विलगिकरण कक्षाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना अंडी वाटप करण्यात आली.मळेवाड जकातनाका येथील राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर 1 मध्ये ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून गावातील कोरोना बाधित रुग्णांसाठी गाव विलगिकरण कक्ष सुरू केला.आहे. सर्व सोयींनी युक्त असा हा कक्ष असल्याने दाखल…

Read More

हॉटेल बंद असल्याने मालक, कर्मचारी आर्थिक अडचणीत

जुलैमध्ये तरी आंबोली धबधबा सुरु करावा;नागरिकांची मागणी *💫आंबोली दि.१५-:* कोरोनामुळे सलग दोन वर्ष आंबोलीतील पर्यटन बंद असल्याने हॉटेल व्यवसाय देखील बंद आहेत. त्यामुळे तेथील व्यवसायिकांसह या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या मजुरांचे देखील हाल होत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हॉटेल व्यवसाय बंद असल्याने हॉटेल व्यवसायिकांनी घेतलेल्या बँकाच्या कर्जाची परतफेड कशी करावी त्याचे हफ्ते कसे फेडावे…

Read More

महिला रुग्णालयातील कोविड सेंटर सुरुच राहणार

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचे आदेश;आ वैभव नाईक यानी केली होती मागणी *💫कुडाळ दि.१५-:* कुडाळ येथील महिला रुग्णालयातील कोविड केअर सेंटर मधील सध्या उपलब्ध असलेल्या ७० ऑक्सिजन बेड ची क्षमता वाढविण्यासाठी तसेच ऑक्सिजन लाईन चे काम सुरु करण्यासाठी महिला रुग्णालयातील कोविड केअर सेंटर हे ओरोस येथे हलविण्यात येणार होते. परंतु सध्या कुडाळ शहरामध्ये इतर कोविड केअर…

Read More
You cannot copy content of this page