मालवण दि प्रतिनिधी
मालवणचे सुपुत्र तथा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रोशन मुकुंद आचरेकर यांना मोटर वाहन निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली असून त्यांची नियुक्ती अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे झाली आहे.
मालवण दांडी येथील रहिवाशी रोशन आचरेकर यांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून मालवण दांडी येथील प्राथमिक शाळेत झाले व पुढील शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय सांगेली सिंधुदुर्ग येथे झाले आहे. तर इंजिनिअरिंगचे शिक्षण संगमेश्वर रत्नागिरी येथे झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेतून त्यांची नियुक्ती आरटीओ खात्यात सहायक मोटर वाहन निरीक्षक पदी 2017 मध्ये मुंबई बोरिवली येथे झाली होती. आता त्यांची पदोन्नती अकोला येथे झाली आहे एक अभ्यासू, कष्टाळू व सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे आलेले अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या पदोन्नतीचे जिल्ह्यातील आणि मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.