चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ‘संजीवनी पर्वत’ देखावा लक्षवेधी…!

⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी येथील चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ‘संजीवनी पर्वत’ देखावा लक्षवेधी ठरत असून यंदा कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती ११ दिवसांसाठी विराजमान झाली आहे‌. जिल्ह्यात सार्वजनिक गणपतीची कागदी लगद्यापासून मूर्ती तयार करण्याचा मान या मंडळाला मिळाला आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश या मंडळांने दिला आहे.

यंदा या मंडळाचे ३५ वे वर्ष असून गणराया समोरील चलचित्र देखावा लक्षवेधी ठरला आहे. हा देखावा येथील समीर लाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारला आहे. या देखाव्याय रावणाशी युद्ध करताना लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडल्यावर, हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी नावाची औषधी वनस्पती आणण्यासाठी तो पर्वतच उचलून आणल्याचा हा देखावा आहे. संजीवनी पर्वत आणि त्यावरील वनस्पतीची कथा भारतीय पौराणिक कथेत विशेषतः रामायणात अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

दरम्यान, यंदा कागदी लगद्यापासून मूर्ती बनवित पर्यावरण पूरक गणेशोत्सव मंडळाकडून साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यात कागदी लगद्यापासूनची मूर्ती बसविणार हे पहिलंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठरल आहे. याचे मुर्तीकाम चिन्मय जाधव यांनी तर रंगकाम अमित चितारी यांनी केलं आहे. यंदा ३५ व वर्ष असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यावेळी उपस्थित राहून तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राघवेंद्र चितारी, सेक्रेटरी मंदार नार्वेकर, सहसचिव शेखर तेंडोलकर, खजिनदार योगेश सुराणा, सह खजिनदार राजेश काणेकर, उदय चितारी, गौरव दळवी, शुभम वर्दम, महेश चितारी आदींनी केले आहे.

You cannot copy content of this page