मुंबई – गोवा महामार्गावर कासार्डे येथे झाला अपघात..
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ ते लांजा असा प्रवास करत असताना पुढील डाव्या बाजूचा टायर फुटून कारवरील नियंत्रण सुटले व कार पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. महामार्गावरील कासार्डे ब्रिजवर शनिवारी सकाळी १०.४५ वा. च्या सुमारास झालेल्या या अपघातात कार चालक दत्तात्रय विलास ठाकूर ( वय ३८, कुडाळ – माठेमाड ) यांना काहीशी दुखापत झाली. तसेच कारचेही बरेचसे नुकसान देखील झाले. याबाबत ठाकूर यांच्या खबरीनुसार अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.