ओबीसींच्या भावनांचा उद्रेकाचा वणवा राज्यभर पसरल्यास मुख्यमंत्री जबाबदार

कुडाळ येथील भाजप आंदोलनात नीलेश राणेंचा इशारा *💫कुडाळ दि.२६-:* ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले आहे. त्यामुळेच ओबीसी समाज आज रस्त्यावर उतरला आहे. ही फक्त सुरुवात आहे, समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला आणि संतापाचा वणवा महाराष्ट्रभर पसरला तर त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांची राहील, असा गंभीर इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस खासदार निलेश राणे…

Read More

डॉ.डेनिस नाडार यांचा राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरव

*💫कणकवली दि.२६-:* कणकवली शहरातील परबवाडी येथील डॉ. डेनिस नाडार हे शेकडो कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. मागील कोरोना काळापासून आजपर्यंत त्यांनी आपले रुग्णालय बंद न ठेवता रुग्णांची शुश्रूषा सुरू ठेवली असून विशेष म्हणजे रविवारी ही त्यांनी दवाखाना सुरू ठेवत रुग्णांना दिलासा दिला आहे.यांबद्दल डॉ.डेनिस नाडार यांचा राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या…

Read More

केंद्र सरकार डाटा देत नसल्‍याने राज्‍यातील आेबीसींचे आरक्षण लटकले

केंद्राने राज्‍याला सामाजिक-आर्थिक व जाती जणगणनेची माहिती द्यावी:सुजित जाधव *💫कणकवली दि.२६-:* केंद्राने राज्‍याला सामाजिक-आर्थिक आणि जातीनिहाय सर्वेक्षणाचा डाटा दिला तर आरक्षणाची अंमलबजावणी लगेच होऊ शकते. परंतु केंद्र सरकार हा डाटा देत नसल्‍याने राज्‍यातील आेबीसींचे आरक्षण लटकले असल्‍याची माहिती शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख सुजित जाधव यांनी आज दिली. सुजित जाधव म्‍हणाले, सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द…

Read More

एस. टी. तील दुकानदारांच्या भाडेमाफीचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेणार:ना.अनिल परब

टाळेबंदीत पुर्ण तर उर्वरीत कालावधीसाठी १५ टक्के शुल्क आकारणीची मागणी *💫कणकवली दि.२६-:* कोरोना महामारीच्या कालावधीत एस. टी. ची प्रवासी सेवा आठ-नऊ महीने बंद होती. उर्वरित कालावधीतही सुरु असलेली प्रवासी सेवा अत्यंल्प होती. त्यामुळे एस. टी. च्या परवानाधारक दुकानदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या परवाना भाडे (शुल्क) माफीच्या मागणीबाबत येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला…

Read More

लॉकडाऊन कालावधी बेकायदेशीर दारू वाहतुकीस ठरतेय पर्वणी

प्रशासनाने अनेकवेळा लक्ष वेधुनही दुर्लक्ष;जिल्हा मद्यविक्रेता अध्यक्ष शेखर गाड यांचा आरोप *💫मालवण दि.२६-:* सध्या मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीर दारू वाहतूक, विक्री यासह केमिकल युक्त दारूचा सुळसुळाट वाढला असून याकडे उत्पादन शुल्क विभागाबरोबरच पोलीस यंत्रणेनेही याकडे दुर्लक्ष केल्याने बेकायदेशीर दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यासाठी लॉक डाऊनचा काळ ही एक जणू पर्वणी ठरल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यात उमटू लागली आहे…

Read More

सुर्यकांत साळगावकर यांचे निधन

*💫मालवण दि.२६-:* आचरा पिरावाडी येथील दक्षिण वाडा रापण संघाचे सदस्य असलेल्या सुर्यकांत सोनु साळगावकर वय ७४ रा पिरावाडी याचे शनिवारी वृध्दापकाळाने मुंबई येथे निधन झाले. दक्षिणवाडकर रापण संघाच्या होडीवर तांडेल (सुकानी) म्हणून ते काम पहायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, भावजय, तीन पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.दिनेश व कल्पेश साळगावकर यांचे ते वडील होत.

Read More

वैभववाडी महाविद्यालयात छ.शाहू महाराज जयंती साजरी

*💫वैभववाडी दि.२६-:* महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करीन महाविद्यालय ग्रंथालयांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा.डॉ.एन व्ही गवळी…

Read More

वैभववाडी बौद्ध सेवा संघाच्या अध्यक्षा शुभांगी यादव यांचे निधन

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्या ग्रामीण शाखेच्या अध्यक्षा शुभांगी ऊर्फ माई सुर्यकांत यादव वय ६७ (रा.नाधवडे बौध्दवाडी ) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान मुंबई येथे निधन झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात काम करत असता त्यांनी स्वतःचे वेगळे अस्वित्व निर्माण केले होते.त्यामुळेच वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली…

Read More

मालवण राष्ट्रीय कॉंग्रेसचे बांगीवाडा समाजमंदिर समोर आंदोलन

केंद्राच्या अघोषित आणीबाणी विरोधात दिल्या घोषणा मालवण दि (प्रतिनिधी) केंद्र सरकारने अघोषित आणीबाणी केल्याचा आरोप करत त्या विरोधात आज मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधित मालवण बांगीवाडा येथील समाजमंदिरासमोर काळ्या फिती लावून व काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकारने देशात अघोषित…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४७ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२६ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४७ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात ३४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात बाहेरचावाडा १, सालईवाडा ३, झिरंग ३, जुनाबाजार २, मोरडोंगरी १, खासकीलवाडा १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात माडखोल १, बांदा ३,…

Read More
You cannot copy content of this page