*💫सावंतवाडी दि.२६ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४७ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात ३४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात बाहेरचावाडा १, सालईवाडा ३, झिरंग ३, जुनाबाजार २, मोरडोंगरी १, खासकीलवाडा १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात माडखोल १, बांदा ३, निगुडे १, माजगाव ३, मळगाव २, तळवडे ५, वेत्ये २, दाणोली २, सोनुर्ली १, आजगाव ३, किनळे १, सांगेली ३, आंबोली १, गेळे १, कारिवडे २, चराठा १, डोंगरपाल १, इन्सुली १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ४६५ रुग्ण सक्रिय आहेत.
