शिवसैनिकांनी एकत्रित रित्या काम करून संघटना वाढीसाठी मेहनत घ्यावी – आ. वैभव नाईक

*💫कुडाळ दि.१५-:* राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे कोकणावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केले. कुडाळ महिला बाल रुग्णालय कोरोना रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहे. तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीवेळी त्यांनी पूर्ण ताकद लावून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी शासकीय पातळीवर बळ दिले. नुकसान भरपाई मिळवून देऊन लोकांना दिलासा दिला.लोकांच्या अडचणीच्या वेळी आपण त्यांना…

Read More

ऑलिंम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देणाऱ्या ‘चिअर्स स्टँड’चे जिल्हाधिकाऱ्यांनी केले उद्घाटन

*💫कणकवली दि.१५-:* टोकीया ऑलिंम्पिक २०२० चे आयोजन २३ जूलै ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात येणार असून यामध्ये भारत देशाचे १२६ खेळाडूंचे पथक सहभागी होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील दहा खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सदर खेळाडूंना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा…

Read More

निसर्ग मित्रपरिवाराकडून तळेरे दत्तमंदिर येथील ग्रा.पं. उद्यान परिसरात वृक्षारोपण’

*💫कणकवली दि.१५-:* निसर्ग मित्रपरिवाराचे ज्येष्ठ सदस्य तथा विद्यमान सहसचिव चंद्रकांत उर्फ राजू जठार यांनी ‘जन्मदिवशी वृक्षारोपण’ या निसर्ग मित्रपरिवाराच्या अभिनव उपक्रमाला प्रतिसाद देत, विविध प्रकारच्या ५० फळ व फुलझाडांची लागवडीलायक रोपे निसर्ग मित्रपरिवारास भेट स्वरूपात उपलब्ध करून दिली. तळेरे दत्तमंदिर येथील ग्रामपंचायत अखत्यारीत असलेल्या उद्यान परीसरात प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षारोपण कार्यक्रमास निसर्ग…

Read More

18 वर्षावरील वयोगटासाठी लसीकरण सत्र

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीच्या पहिला व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र शुक्रवार दि. 16 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणीची सोय देखील उपलब्ध आहे. तरी 18 वर्षावरील नागरिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित रहावे व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर…

Read More

राणेंना केंद्रीय मंत्रीपद हा महाराष्ट्राचा सन्मान:अतुल काळसेकर

*💫कणकवली दि.१५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आणि आमचे मार्गदर्शक नारायण राणे तथा सर्वांचे लाडके दादा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात एम. एस.एम.ई. चे कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला.हा केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचा सन्मान आहे,अशी प्रतिक्रिया बँक संचालक अतुल काळसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ना.नारायण राणे आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातुन चांगल्या प्रकारे देशाला, पर्यायांने…

Read More

तिलारी धरणातून एकूण 11 हजार 808 क्युसेक्स विसर्ग

17 लघु व 1 मध्यम प्रकल्प फुल्ल *💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 11 हजार 808 क्युसेक्स विसर्ग सुरू असून त्यामध्ये सांडवा – 11 हजार 473, कलवा – 229 आणि विद्युत प्रकल्प – 105 क्युसेक्स असा विसर्ग आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 383.4010 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.70 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस…

Read More

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सर्वच तालुक्यात पावसाचे शतक

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे शतक झाले असून गेल्या चोवीस तासात सरासरी 156.72 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 198 मि.मी. नोंद झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1853.03 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून…

Read More

कळसुलकर हायस्कूलमधील निवडक गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वितरण

*ऑस्ट्रेलिया येथील गिरीश मरकाळे यांनी दिलेल्या देणगीतून वाटप *💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी मधील तीन विद्यार्थिनींना श्री गिरीश बी मरकाळे (ऑस्ट्रेलिया)* यांनी दिलेल्या देणगीतून सायकल प्रदान करण्यात आल्या. प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री विष्णू शिरोडकर यांच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया स्थित श्री गिरीश बी मरकाळे यांनी…

Read More

वैभववाडीत उद्या शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान

तालुका प्रमुख मंगेश लोके यांची माहिती वैभववाडी प्रतिनिधी शिवसेना पक्षाच्या शिवसंपर्क अभियानाला उद्या दि. १५ जुलै रोजी. साय. ५ वा. वैभववाडीत शुभारंभ होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कोकीसरे माधवराव पवार विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार…

Read More

*जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर मायकल डिसोजा यांची बिनविरोध निवड*

*💫सावंतवाडी ता.१४-:* जिल्हा परिषद स्थायी समितीवर जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ही निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष मायकल डिसोजा हे समाजकारण करत असून, त्यानी आपल्या जिल्हा परिषद मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून विकास केला आहे. या कामाची दखल घेऊन खासदार विनायक…

Read More
You cannot copy content of this page