तळाशील गावात ५४ लाखाचे दोन धूपप्रतिबंधक बंधारे मंजूर

तळाशील वासियांना पालकमंत्री उदय सामंत व आ. वैभव नाईक यांचा दिलासा *⚡कणकवली ता.१४-:* तौकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तळाशील येथील आपत्ती व्यवस्थापनासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हा नियोजन मधून तळाशील गावात ५४ लाखाचे दोन बंधारे (संरक्षक भिंत) मंजूर करून घेतले आहेत. यामध्ये तळाशील तोंडवली खाडी किनारी बाळा पेडणेकर…

Read More

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8.00 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस-सिंधुदुर्ग येथे राखीव. सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस-सिंधुदुर्ग येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंडकडे प्रयाण. सकाळी 9.05…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 2 हजार 152 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 358.9930 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.25 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 12.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत.देवघर – 72.4200, अरुणा –…

Read More

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 25 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 25 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 9.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2958.1125 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -11 (2911), सावंतवाडी -6…

Read More

सुभाष आपटेकर यांचा बांदा भाजपच्या वतीने सत्कार

दोडामार्ग तालुका येथे प्रशासकीय बदली झाल्याने आयोजित निरोप समारंभात सत्कार *⚡बांदा दि.१४-:* गेले साडेपाच वर्ष बांदा येथे कार्यरत असलेले सुभाष आपटेकर यांची दोडामार्ग तालुका येथे प्रशासकीय बदली झाल्याने काल बांदा भाजपच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. दरम्यान आपटेकर यांनी बांदा…

Read More

गाबीत समाज इतिहास आणि जाती सर्वेक्षणवेळी माहीतीसाठी पुरावे व संदर्भ पुस्तक तयार करणार

माहिती पाठविण्याचे चंद्रशेखर उपरकर यांचे आवाहन *⚡कणकवली ता.१४-:* अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ,मुंबई तर्फे महाराष्ट्र,गोवा व कर्नाटक राज्यातील संपूर्ण गाबीत समाजाचा इतिहास भावी पीढिपुढे यावा आणि जातींच्या सर्वेक्षणाच्या वेळी शासनास पुरावे व संदर्भ म्हणूनही उपयुक्त ठारावी असे माहितीपूर्ण पुस्तक तयार करण्याचे काम चालू असून त्यासाठी माहिती पाठविन्याचे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे संघटक चंद्रशेखर…

Read More

सावंतवाडी-मडुरा मार्गे सातोसे एसटी पंधरा दिवसांत सुरू करा

अन्यथा उपोषण छेडणार : भाजपचे बाळू गावडे यांचा इशारा – बाजाररहाटसाठी ग्रामस्थांना बसतो आर्थिक भुर्दंड *⚡बांदा दि.१४-:* गत काही दिवसांपासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे प्रशासनाकडून अनलाॅक प्रक्रिया सुरू आहे. लांब पल्ल्याच्या एसटी बसफेऱ्या सुरू झाल्या तरी ग्रामीण भागातील मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांना बसची प्रतीक्षा कायम आहे. गणेशोत्सव खरेदीसाठी बांदा व सावंतवाडी बाजारपेठेत जाण्यासाठी ग्रामस्थांना आर्थिक…

Read More

जयहिंद देशभक्ती गीत गायन स्पर्धेत आंबेगाव शाळेचे यश

‘क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन’ उपक्रमाअंतर्गत कोलगाव केंद्राच्यावतीने आयोजन* *⚡सावंतवाडी ता.१३-:* ‘क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन’ या उपक्रमाअंतर्गत कोलगाव केंद्राच्यावतीने केंद्रस्तरावर घेण्यात आलेल्या जयहिंद देशभक्ती गीत गायन स्पर्धेत आंबेगाव शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. कोविडच्या काळातही ग्रामीण भागातील मुलांना, शैक्षणिक गुणवत्ता स्तरावर ठेवण्यासाठी कोलगाव केंद्राच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रमांचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून क्रांतीदिन ते…

Read More

युवा फोरम संस्थेतर्फे २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

*⚡कणकवली दि.१३-:* राज्यभरात सर्व स्वयंसेवकांच्या सहयोगाने युवा फोरम संस्थेच्यावतीने मुंबई शहरात वॉल ग्राफिटी , सोलापूर येथे स्वच्छता मोहीम , रत्नागिरी येथे माणुसकीची भिंत असे राज्यभरात बऱ्याच प्रकारचे सामाजिक कार्यक्रम २१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या दरम्यान हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत . तसेच सिंधुदुर्ग जिल्हा हे या संस्थेचा उगमस्थान व इथेच पाया रचलेला असल्यामुळे जिल्हाभरात…

Read More

खारेपाटण येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू

*⚡कणकवली ता.१३-:* पनवेल येथील प्रशांत यशवंत पाटणकर ( ४०, मूळ रा. पंचशीलनगर, खारेपाटण ) यांचा खारेपाटण येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मृतदेह आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही उघडकीस आली. प्रशांत यशवंत पाटणकर यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. प्रशांत पाटणकर हे पनवेल येथून ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कामाला…

Read More
You cannot copy content of this page