खारेपाटण येथे एसटी कलंडली सुदैवाने जीवित हानी टळली

*⚡कणकवली ता.१३-:* राजापूर डेपोची खारेपाटण -तळगाव- राजापूर ही एस. टी .बस खारेपाटण बसस्थानकातून सुटल्यानंतर समोरून आलेल्या एस. टी. गाडीला साईड देताना बाजूला कलंडल्याने अपघात झाला. सुदैवाने गाडीत किरकोळ प्रवासी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.दरम्यान सदर अपघात हा खारेपाटण मुख्य रस्त्यावर अवास्तव खाजगी वाहने उभी करून ठेवत असल्यामुळे झाला असल्याचे बोलले जाते. मुंबई – गोवा महार्गावरून…

Read More

दिवंगत माई यादव यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायक…

*⚡वैभववाडी ता.१३-:* वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ ( ग्रामीण) अध्यक्षा दिवंगत शुभांगी उर्फ माई यादव यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायक आहे.संघाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी केलेले काम तालुकावासियांच्या कायम स्मरणात राहील.त्यांच्या अकाली निधनाने एकूणच आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.अशा शब्दात मान्यंवरांनी त्यांना अभिवादन केले. वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २ रूग्ण सापडले…

*⚡सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी तालुक्यात आज २ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ० तर ग्रामीण भागात २ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात ० तर ग्रामीण भागात बांदा १, न्हावेली १, असे रूग्ण सापडले आहेत.

Read More

परबवाडा गावातील दुवाट फर्नांडिस यांचा प्रामाणिकपणा

*⚡वेंगुर्ला ता.१३-:* परबवाडा येथील रहिवासी दुवाट फर्नांडिस यांना आज सकाळी परबवाडा ते मार्केट रोड दरम्यान सापडलेले रोख ४७०० रुपये खात्रीअंती उपसरपंच संतोष सावंत यांना परत केले. याबद्दल संतोष सावंत यांनी दुवाट फर्नांडिस यांचे आभार मानले. यावेळी परबवाडा सरपंच पपु परब, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, सायमन आलमेडा, सर्वेश परब, अजय सावंत, प्रथमेश राणे, भुवनेश परब यांच्या…

Read More

वेंगुर्ल्यात गौरी पूजन थाटात संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.१३-:* वेंगुर्ला शहरासह तालुक्यात काही घरोघरी प्रत्येकाच्या परंपरेनुसार आज गौरी पूजन करण्यात आले. गणेश चतुर्थीप्रमाणे गौरी पूजनालाही तेवढेच महत्त्व आहे. प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे या देवींचा कार्यक्रम तीन, दोन आणि एक दिवस चालतो. त्यानुसार प्रत्येकाच्या परंपरेनुसार रविवारी सायंकाळी व सोमवारी सकाळी देवींचे आगमन झाले. त्यानंतर देवींचे विधीवत पूजन करण्यात आले. देवीसमोर वोवसा भरण्याचा कार्यक्रम महिलांनी उत्साहात…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८हजार ५५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

प्रदीप मांजरेकर यांचे निधन

*⚡मालवण ता.१३-:* मालवण वायरी भूतनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मासळी रिक्षा टेम्पो व्यावसायिक प्रदीप विनायक मांजरेकर (वय ४०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मदतीला धावून येणारे म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, भाऊ असा परिवार आहे. वायरी भूतनाथचे माजी सरपंच शिवराम मांजरेकर यांचे ते बंधू होत.

Read More

लोकांच्या आर्थिक मदतीतून उभारलेल्या प्रवाशी शेडचे लोकार्पण

तिर्लोट आंबेरी ग्रामस्थाचे लक्षवेधी काम देवगड आमचा गावचा विकास आमची जवाबदारी ! या उपक्रमाअंतर्गत बस थांबा प्रवासी निवारा (शेड) उदघाटन सोहळा ! तिर्लोट आंबेरी वाडी, तालुका-देवगड, येथे तिर्लोट आंबेरी माजी विद्यार्थी संघ मुंबई(रजिस्टर) व सर्व स्थानिक रहिवाशी, यांच्या सहकार्याने सोमवार दिनांक -१३ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आंबेरी वाडी बस प्रवासी निवारा शेड सदर…

Read More

नारायण राणे हेच माझ्यासाठी पक्ष आणि पद

त्यामुळे तुमच्या ५० लाखाच्या वडापाव प्रदर्शनात सहभागी नाही;अंकुश जाधव यांचे सेनेच्या प्रदीप नारकर यांना टोला *⚡ओरोस ता.१३-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना पक्ष, पद, आणि प्रतिष्ठा वाटते. त्यामुळे पक्ष बदलण्याचा प्रश्न येतंच नाही. जिथं असू तिथं प्रामाणिक काम करतो. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी तुम्ही पन्नास लाखाच्या वड्याचे प्रदर्शन मांडले होते…

Read More

भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी मालवण येथे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन घेतले गणेश दर्शन

मालवण (प्रतिनिधी) भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी रविवारी मालवण तालुक्यात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्नेहीच्या घरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. गणेशोत्सव काळात निलेश राणेंच्या या गणेश दर्शन दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशा चैतन्यमयी वातावरणात भाजप नेते निलेश राणे यांनी रविवारी मालवणात…

Read More
You cannot copy content of this page