लोकांच्या आर्थिक मदतीतून उभारलेल्या प्रवाशी शेडचे लोकार्पण

तिर्लोट आंबेरी ग्रामस्थाचे लक्षवेधी काम

देवगड आमचा गावचा विकास आमची जवाबदारी ! या उपक्रमाअंतर्गत बस थांबा प्रवासी निवारा (शेड) उदघाटन सोहळा ! तिर्लोट आंबेरी वाडी, तालुका-देवगड, येथे तिर्लोट आंबेरी माजी विद्यार्थी संघ मुंबई(रजिस्टर) व सर्व स्थानिक रहिवाशी, यांच्या सहकार्याने सोमवार दिनांक -१३ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आंबेरी वाडी बस प्रवासी निवारा शेड सदर वास्तु चे समारंभपूर्वक उद्घाटन (लोकार्पण सोहळा) वाडीचे जेष्ठ नागरिक गणपत कडू आणि जमिनीचे मालक भाबल बंधू यांचे हस्ते करण्यात आले.आहे, या उदघाटन सोहळ्यात वाडीतील सर्व रहिवाशांनी उपस्थिती लावली .सदर वास्तूचे काम संघटनेच्या विकास निधीतुन करण्यात आले व सर्व ग्रामस्थ आणि सभासदांनी त्यात खारीचा वाटा उचलला. पारंपारिक ढोल ताश्याच्या गजराने सदर कार्यक्रम संपन्न झाला

You cannot copy content of this page