सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१८:* सावंतवाडी तालुक्यात आज २ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात १ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जुनाबाझार १ आणि ग्रामीण भागात चराठा येथे एक असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात ५७ रुग्ण सक्रिय आहेत.

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१८:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ६८०कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

अर्धवट कामे पुर्ण करण्यासाठी पाच दिवसांची डेडलाईन

सावंतवाडी न.प.च्या विविध कामांची वस्तुस्थिती जाणून घेऊन चौकशी अहवाल तयार करणार *⚡सावंतवाडी ता.१८-:* महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध प्रकल्पामध्ये झालेल्या कामांची वस्तुस्थिती जाणून घेऊन तपासणी करून चौकशी अहवाल तयार करण्याचे काम चौकशी समिती प्रमुख आणि तहसीलदार तथा विशेष दंडाधिकारी राजाराम म्हात्रे यांच्या समिती सदस्यांच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. यात नगरपरिषदेच्या…

Read More

सचिन जोईल यांच्या वतीने कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघात अगरबत्ती व मोदक प्रसादाचे वाटप

*⚡देवगड ता.१८-:* देवगड तालुक्यातील कातवण ग्रामपंचायत सदस्य सचिन जोईल यांच्या माध्यमातून गणेशोत्सवा निमित्ताने घरोघरी जाऊन अगरबत्ती तसेच मोदक प्रसादचे वाटप करण्यात आले आहे. सचिन जोईल यांच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात यावर्षी गणेश चतुर्थी निमित्ताने सचिन जोईल यांनी कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघात गावोगावी जाऊन गणेश दर्शन घेऊन अगरबत्ती तसेच मोदक प्रसादचे वाटप केले…

Read More

खास. विनायक राऊत यांनी चष्मा बदलावा म्हणजे केंद्र सरकारने दिलेला निधी व विकास दिसेल

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा टोला;राज्य सरकारने एक रुपया तरी दिला का? *⚡कणकवली ता.१८-:* दोन वर्षांत राज्याला केंद्राकडून पैसे आले नाहीत असे म्हणणारे खास.विनायक राऊत कोणत्या चष्म्यातून बघतात ते समजत नाही. आतापर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून ७७ टक्के लसीकरण पूर्ण झाले.८० हजार कोटी लोकांना करोडो रुपये खर्च करुन केंद्र सरकार मोफत धान्य देत आहे. देशात ६०…

Read More

संततधार पावसामुळे भातपिकाला ‘पळींज’ होण्याची शक्यता

*⚡बांदा दि.१८-:* गणेशोत्सवाच्या अगोदर दोन दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर वाढत असल्यामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बांदा दशक्रोशीतील हळवी भातपिके तयार होत असून सुरू असलेल्या पावसाने लोंबामध्ये पळींज(पॉल) होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी पिके जमिनदोस्त झाली आहेत.  पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास करपा रोगातून वाचलेली पिके वाया जाणार असल्याच्या चिंतेने बळीराजा हतबल…

Read More

सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांचे आम.दिपक केसरकर यांनी केले स्वागत

पूर्वीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांची रत्नागिरीला बदली *⚡सावंतवाडी ता.१८-:* सावंतवाडीच्या प्रांताधिकारी पदी रत्नागिरी रोहयोचे उपजिल्हाधिकारी श्री प्रशांत पानवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन प्रांताधिकारी यांची आमदार दिपक केसरकर यांनी भेट घेत त्यांचे सावंतवाडीत स्वागत केले आहे. यावेळी सावंतवाडीचे पूर्वीचे प्रांताधिकारी तथा रत्नागिरीचे निवासी उप जिल्हाधिकारी श्री. सुशांत खांडेकर उपस्थित होते.

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.१८-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून 370.755 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 412.4950 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 92.20 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 86.8570, अरुणा – 78.9250,…

Read More

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3648.6075 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -0(3611), सावंतवाडी -1(3971.10), वेंगुर्ला…

Read More

खिशात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा अशी सरकारची परिस्थितीत

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची राज्यसरकार वर जोरदार टीका *⚡सावंतवाडी ता.१८-:* सरकार कडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी निधी नसताना राज्य सरकार कोट्यवधीच्या निधीची घोषणा करत आहे. खिशात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा अशी परिस्थिती राज्य सरकारची झाली आहे. अशी जोरदार टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर केली आहे….

Read More
You cannot copy content of this page