वृक्षारोपण हे भविष्याच्या दृष्टीकोनातुन केलेली प्राणवायुची तरतूद : शितल आंगचेकर

वेंगुर्ले मध्ये संत निरंकारी मंडळातर्फे वृक्षारोपण *⚡वेंगुर्ले ता.१९-:* मागील दोन वर्षाच्या कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता जाणवली कारण मोठ्या प्रमाणावर होणारी झाडांची कत्तल आहे. परंतु आजच्या संकटाचा अभ्यास करत उत्तम आरोग्य व ऑक्सिजनची तरतूद करण्यासाठी, भविष्याच्या दृष्टीकोनातून विचार करता, वृक्षारोपणाच्या माध्यमातून आपण राबवत असलेली संकल्पना स्तुत्य आहे. असे प्रतिपादन वेंगुर्ले न.प. उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर यांनी केले….

Read More

ओसरगाव तलाव पर्यटन विकासाला चालना देणार :नागेश फाटे

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग, व्यापार प्रदेशाध्यक्ष यांनी ओसरगाव तलावाला दिली भेट *⚡कणकवली ता.१९-:* राष्ट्रवादी काँग्रेस व्यापार उद्योग विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी कणकवली तालुक्यातील निसर्गरम्य ओसरगाव तलावाला भेट देत लेकव्ह्यू टुरिझमचा आंनद लुटला. राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी लगत असलेले ओसरगाव तलावाचे निसर्गसौंदर्य थक्क करणारे आहे.ओसरगाव तलाव हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रवादी…

Read More

कै. गुरुवर्य प्रमोद सुतार यांच्या शिष्य-परीवारातर्फे २४ रोजी शोकसभा

*⚡कणकवली ता.१९-:* प्रसिद्ध भजन सम्राट मृदुंगमनी तसेच किर्तनकार गुरुवर्य प्रमोदजी सुतार यांचे २ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने सिंधुदुर्ग जिल्हयातील शिष्य परिवार पोरका झाला. संगीत क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली.त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील समस्त शिष्य-परीवाराच्यावतीने रविवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक १० वा. ‘भावगंगा सदन’ श्री. पांडुरंग हडकर (कृषी),…

Read More

नागरिक म्हणून कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक – ऍड. एम. जी. बांदेकर

*⚡मालवण ता.१९-:* कायदा हा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. विविध स्तरावर येणाऱ्या अडचणीत दाद मागण्यासाठी आपल्याला कायद्याचा आधार घ्यावा लागतो. म्हणूनच नागरिक म्हणून कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ऍड. एम. जी. बांदेकर यांनी हेदुळ येथे बोलताना केले. मालवण तालुक्यातील हेदुळ येथील पूर्ण प्राथमीक शाळा येथे आज़ादीका अमृतमहोत्सव अंतर्गत विधी सेवा प्राधिकरण तर्फे कायदेविषयक…

Read More

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचारप्रकरणी पोलिस कोठडी

*⚡सावंतवाडी ता.१९-:* लग्नाचे आमिष दाखवून तालुक्यातील एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी वेगुर्ला तालुक्यातील एका युवकावर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.

Read More

खारेपाटण येथे २२ रोजी भाजीपाला उत्पादन व परसबाग प्रशिक्षण

*⚡कणकवली ता.१९-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवार दिनांक २२ ऑक्टोबर, २०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथे सकाळी १०.०० ते दुपारी १.३० या दरम्यान भाजीपाला उत्पादन व परसबाग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत यांनी दिली. शासनाच्या १५ व्या वित्त आयोगातून घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण वर्गाला सांगूळवाडी, ता….

Read More

नांदगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरी

*⚡कणकवली ता.१९-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद उत्साहात साजरी केली. यानिमित्ताने नांदगाव तिठापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती .अबाल वृध्दांपासून ते छोट्यापर्यंत यात उत्साहाने सहभागी झाले होते. नांदगांव गौसिया मजिद येथून रॅली काढून संपूर्ण मुस्लिम मोहला नांदगांव तिठा येथे येऊन तकरीर करण्यात आली. यावेळी नारे तकबीर अलाहो अकबर नारे रिसालत या रसूलूलाह…

Read More

सांगवे केळीचीवाडी येथील सुलोचना सावंत यांचे निधन

*⚡कणकवली ता.१९-:* कणकवली तालुक्यातील सांगवे केळीचीवाडी येथील श्रीमती.सुलोचना हरी सावंत(वय ९०) यांचे १९ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ७.४५वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.तीच्या पश्चात तीन मुलगे,दोन मुली,सुना, जावई,नातवंडे असा परिवार आहे. माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आर.एच.सावंत व सांगवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच महेंद्र हरी सावंत. यांच्या त्या मातोश्री होत.

Read More

ग्रामस्थानीच श्रमदानातून बुजविले रस्त्याचे खड्डे

धामापूर ग्रामस्थाचा पुढाकार चौके-नेरूरपार रस्ता:वाहने चालविताना चालकांना करावी लागतेय कसरत मालवण (प्रतिनिधी) चौके नेरुरपार कुडाळ या मुख्य रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करून वाहने चालवावी लागत असल्याने अपघातही घडत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावरील धामापूर येथे स्थानिक तरुणांनीच एकत्र…

Read More

कोर्ले येथे 26 रोजी कविवर्य आ.सो.शेवरे स्मृती साहित्य जागर

काव्य पुरस्कार वितरण आणि खुले कविसंमेलन *⚡कणकवली ता.१९-:* ‘एस. के. फाउंडेशन’ कोर्ले (देवगड) आणि कोर्ले ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कोर्ले गावचे सुपुत्र कविवर्य आ.सो.शेवरे यांच्या स्मृतिदिनी कोर्ले येथे मंगळवार 26 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 वा. आ.सो.शेवरे साहित्य जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कविवर्य आ.सो. शेवरे काव्यपुरस्कार वितरण आणि खुले कविसंमेलन आयोजित करण्यात…

Read More
You cannot copy content of this page