वीज पडून मृत्यू पावलेल्या राजश्री शिंगाडे यांच्या कुटुंबाला ४ लाखांची मदत

नायब तहसीलदार ए के नाईक यांनी दिला धनादेश वैभववाडी प्रतिनिधी वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या आचिर्णे धनगरवाडा येथील राजश्री राजाराम शिंगाडे यांच्या कुटुंबाला शासनातर्फे ४ लाखांची आर्थिक मदत दिली. या मदतीचा धनादेश नायब तहसीलदार ए. के. नाईक यांनी त्यांचे पती राजाराम शिंगाडे यांना सुपूर्द केला. राजश्री शिंगाडे ४ ऑक्टोबरला गुरे चारण्यासाठी गेल्या असताना वीज कोसळल्याने त्यांचा…

Read More

नीट परीक्षेत श्रृती मधुकरचे उज्ज्वल यश

*⚡कणकवली ता.०७-:* कणकवली शिवाजीनगर येथे राहणारी श्रुती मोहन मधुकर हिने नीट परिक्षेत ६०० गुण मिळवून उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. ऑल इंडिया रँकमध्येही ती आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल असल्याची माहिती तिचे वडील मोहन मधुकर यांनी दिली. श्रुतीचे वडील कणकवली रेल्वे स्टेशन येथे स्टेशनमास्तर आहेत. श्रुती हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूलमध्ये झाली….

Read More

दशावतारांच्या मेळाव्याला लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती

आगामी निवडणूकांना मतदान न करण्याचा निर्णय *⚡वेंगुर्ला ता.०७-:* वेंगुर्ला-मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात ७ नोव्हेंबर रोजी दशावतार कलाकारांचा ऐक्य शक्ती प्रदर्शन मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला अनेक लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले होते. परंतु, त्यातील फक्त दोन ते तीनच लोकप्रतिनिधी उपस्थित राहिल्याने दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाचे जिल्हा अध्यक्ष पुरूषोत्तम कोचरेकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत यापुढे दशावतार…

Read More

११११ पणत्यांनी उजळले मारुती मंदिर

*⚡वेंगुर्ला ता.०७-:* प्रतिवर्षाप्रमाणे वेंगुर्ला येथील मारुती स्टॉप येथे दिवाळी निमित्त ११११ पणत्या प्रज्वलित करुन दीपोत्सव करण्यात आला. हा कार्यक्रम ५ नोव्हेंबर रोजी पार पडला. श्री हनुमान मंदिर सेवा न्यास तर्फे आयोजित केलेल्या या दीपोत्सवात बहुसंख्य भाविकांनी सहभागी होत आनंद लुटला.

Read More

शहरातील सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवा

मंगेश तळवणेकर यांची मागणी *⚡सावंतवाडी ता.०७-:* शहरात बसविण्यात आलेले बरेच सीसीटीव्ही कॅमेरे बंदावस्थेत असून काहीमध्ये रेकॉडिंग होत नाही. त्यामळे शहरात घडलेल्या खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांची अद्याप उकल झालेली नाही. त्याचप्रमाणे तालुक्यासह ज़िल्ह्यातही पोलीसबळ अत्यल्प प्रमाणात आहे. याचा विचार करून शहरातील सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी. तसेच पोलीस संरक्षणाताही वाढ करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते…

Read More

सेवांगणच्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

मालवण दि प्रतिनिधी बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे तुकडोजी महाराज जयंतीनिमित आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंच स्पर्धेला ११० स्पर्धकांनी सहभाग दर्शवला. ऑनलाईन संपन्न झालेल्या या बक्षिस समारंभास सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, संस्थेचे मालवण व कट्टा शाखेचे सर्व पदाधिकारी सर्व कर्मचारी, संस्थेचे हितचिंतक, परीक्षक, देणगीदार, सर्व स्पर्धक उपस्थित होते. स्पर्धेचा…

Read More

आशय परुळेकरने ऑल इंडिया मेडिकल इटरन्स परीक्षेत मिळविले सुयश

७२० पैकी ६६६ गुण मिळाले रोझरी इंग्लिश स्कुलचा विद्यार्थी मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील रोझरी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कुमार आशय हरिष परुळेकर याने यावर्षीच्या ऑल इंडिया मेडिकल एन्ट्ररन्स परीक्षेत (नीट) ७२० पैकी ६६६ गुण (९९.९७) टक्के मिळवून प्रशंसनीय यश संपादन केले. त्याने एमएचटी- सीईटी परीक्षेत पीसीबी ग्रुपमध्ये ९९.९९ टक्के मिळवून महाराष्ट्रात २२ वा क्रमांक मिळविला….

Read More

वडाचापाट बौद्धवाडीतील महेंद्र कासले यांचा मृतदेह मिळाला

मसदे ओढ्यात पुलाखाली पाण्यात बुडल्याचा अंदाज मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील वडाचापाट बौद्धवाडी येथील महेंद्र राजाराम कासले या ५४ वर्षीय इसमाचा मृतदेह मसदे येथील ओढ्यात एका झुडपाला अडकलेला अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे दरम्यान, ओढ्यात पुलाखाली हात-पाय धुण्यासाठी गेले असता पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र कासले…

Read More

वेंगुर्ला तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा दि. 9 नोव्हेंबर ला साईमंगल कार्यालयात

*⚡वेंगुर्ले ता.०७-:* वेंगुर्ले तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवार दि. 9 रोजी सकाळी 10.30 वाजता वेंगुर्ला तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळील साईमंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. अशी माहिती वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी दिली. या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार…

Read More

डेगवे-बाजारवाडी बाजारपेठेतील घराला आग

एक गंभीर जखमी : घरातील सामानासह दोन दुचाकी जळून खाक *⚡बांदा ता.०७-:* डेगवे-बाजारवाडी येथील भर बाजारपेठेतील रुपेश केसरकर यांच्या घराला काल रात्री शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची घटना घडली. आग विझविताना रुपेश केसरकर हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यांचे बंधु गंगाराम केसरकर यांच्या हाताला व पायाला भाजल्याने दुखापत झाली….

Read More
You cannot copy content of this page