मागासवर्गीय वस्तींच्या नामांतराचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण…

सिंधुदुर्ग ठरला देशातील पहिला जिल्हा – पालकमंत्री नितेश राणे..

⚡देवगड ता.१२-: राज्य शासनाचा प्रतिनिधी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागासवर्गीय वस्तींची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक उपक्रम आपण पूर्ण केला आहे . महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात असा अभिनव उपक्रम राबवणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा ठरल्याचे त्यांनी नमूद केले. बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच समाजकल्याण निधीतून सुमारे नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचेही प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी पडेल येथील आयोजित धम्म मेळाव्या प्रसंगी केले.
देवगड तालुक्यातील गिर्ये बौद्धजन सेवा समिती यांच्यावतीने आयोजित पडेल येथील धम्म मेळावा व बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना आणि विविध सामाजिक-धार्मिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.या कार्यक्रमास राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकासमंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव आंबेडकर , माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर, देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा समाजात व्यापक प्रचार-प्रसार होण्याची गरज व्यक्त केली.थायलंडमधून आणलेल्या बुद्धमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा उल्लेख करत त्यांनी बुद्ध धम्मातून समता, बंधुता आणि मानवतेचे विचार समाजात रुजविण्याचा संदेश दिला. सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आरक्षण वर्गीकरण, जनगणना आणि समाजकल्याण निधी याविषयीही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर म्हणाले, “आम्ही उभारलेल्या बुद्ध विहारांमध्ये वर्षभर बुद्ध वंदना सुरू असते. गिर्ये गाव एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करत असल्याचा अभिमान वाटतो.” यावेळी सलग बुद्ध वंदना म्हणणाऱ्या तिघांचा सोन्याची नाणी व चांदी देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच डी. के. पडेलकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा बुद्धमूर्ती आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर महाराष्ट्राचे माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर, तहसीलदार आर. जे. पवार, गावचे सरपंच भूषण पोकळे, डी. के. पडेलकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळाचे अध्यक्ष दीपक गिरकर, सचिव प्रशांत गिरकर, ग्रामीण अध्यक्ष संतोष गिरकर, ग्रामीण सचिव सचिन गिरकर, पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा अनघा गिरकर, सचिव संजना गिरकर, ग्रामीण अध्यक्षा आरती गिरकर, ग्रामीण सचिव अक्षता गिरकर आदी पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
धम्म मेळाव्यासाठी के. एस. कदम, सुर्यकांत साळुंके, मनोहर सावंत, उत्तम कांबळे, दिलीप वाडेकर, सत्यवान पेंढारकर तसेच सल्लागार सदस्य अनिल पुरळकर, संजय कांबळे, सुनील कांबळे, किशोर कांबळे यांच्यासह महिला कार्यकारिणीतील कनिष्ठा तिर्लोटकर, अर्पिता साळुंखे, सुरभी पुरळकर, संजीवनी गिरकर, अश्विनी पडेलकर, ऐश्वर्या कांबळे, मनाली वाडेकर, प्रियंका कदम, नमिता कांबळे, रश्मी पडेलकर, सुप्रिया कांबळे, तन्वी पडेलकर आणि करुणा कांबळे आदी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

You cannot copy content of this page