स्थानिक नगरसेवकांना डावलून भूमिपूजन.

नगरसेविका शर्वरी धारगळकर यांचा संताप: नगराध्यक्षा केवळ व्हिडिओ ग्राफी व फोटोग्राफी मिळवण्यात व्यस्त..

⚡सावंतवाडी ता.१२-: शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील गटार बांधून बंदिस्त करण्यासह विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात स्थानिक नगरसेवक व नगरसेविकांना डावलण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर यांनी सत्ताधारी नगराध्यक्षा व प्रशासनावर सडकून टीका केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी करण्यात आलेल्या अनेक विकासकामांचे भूमिपूजन होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला, तरी प्रत्यक्षात कामांना सुरुवात झालेली नाही. नगराध्यक्षा केवळ व्हिडिओग्राफी व फोटोग्राफीच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यात व्यस्त असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
पावसाळ्यापूर्वी गटारांची कामे पूर्ण होणे आवश्यक असताना अद्यापही कामे रखडलेली आहेत. यातील अनेक कामे आमदार Deepak Kesarkar यांच्या माध्यमातून मंजूर झाली असून ती तातडीने सुरू व्हावीत यासाठी शिवसेना नगरसेवक सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता विकासकामांचे भूमिपूजन केल्यास शिवसेनेकडून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही सौ. धारगळकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page