शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थी केंद्रित विचार व कृती आवश्यक – डॉ. सुभाष देव
*⚡मालवण ता.११-:* बदलत्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून सर्व विचार व कृती पार पाडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी केले. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात गुणवत्ता वाढ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवी…
