*⚡देवगड ता.११-: देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उर्वरित प्रभाग क्रमांक ४,५,७,८ या चार प्रभागांसाठी १८ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीचा शुभारंभ महाविकास आघाडीचे शिवसेनेचे निरीक्षक संदेश पारकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. तत्पूर्वी शिवसेना पदाधिकारी व उमेदवार यांनी ग्रामदेवता श्री दिर्बादेवी श्री देव रामेश्वर चे दर्शन घेतले.
तालुका प्रमुख विलास साळसकर,मिलींद साटम,युवा सेना प्रमुख निनाद देशपांडे,सौरभ माने,अवधूत तारी उपतालुका प्रमुख निवृत्ती उर्फ बुवा तारी, शहर प्रमुख संतोष तारी माजी नगरसेवक विकास कोयंडे राजू राणे,स्वप्नाली वाल्मिकी,श्रीकांत मल्हार,दिनेश पारकर,तसेच उमेदवार प्रभाग क्र ४ मनीषा घाडी- प्रभाग क्र सुजाता कुळकर्णी प्रभाग क्र रोहन खेडेकर प्रभाग क्र संतोष तारी तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.या वेळी उपस्थित मान्यवरांनी मागील पाच वर्षात देवगड जामसंडे न.प.हद्दीतील विकास कामे ही ठप्प झाली असून ती पूर्णत्वास नेऊन या नगरपंचायत हद्दीत विकासाची गंगा व भ्रष्टाचार मुक्त कारभार या करिता महाविकास आघाडीला विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला. .फोटो -१)ग्रामदेवता श्री दिर्बादेवी चे दर्शन घेताना शिवसेना पदाधिकारी,व उमेदवार२)शिवसेना प्रचार शुभारंभ करताना निरीक्षक संदेश पारकर व अन्य
