माजी नगरसेवक नासीर शेख यांना पितृशोक

*⚡सावंतवाडी ता.१३-:* येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक नासीर शेख यांचे वडील इस्माईल चांद शेख वय ८९ रा सालईवाडा यांचे आज राहत्या घरी सायंकाळी ५ च्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सालईवाडासह शहरात शोककळा पसरली.शेख हे येथील नगरपालिकेचे निवृत्त अभियंता होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Read More

नारीशक्ती’ पुरस्काराने तळेरेतील पेपर विक्रेत्या अपर्णा अरविंद मुद्राळे सन्मानित

कणकवली ता.१३-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील महिलांचा अनोख्या पध्दतीने सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे त्या महिला ज्या क्षेत्रात काम करतात ती क्षेत्रे एकतर पुरूषी सत्ताक होती किंवा उपेक्षित होती . अशाच क्षेत्रात काम करणार्‍या ‘नारी शक्तीचा वेध घेवून खर्‍या अर्थाने त्यांच्या कार्याचाच गौरव शिक्षक भारतीने केलेला आहे . कणकवली…

Read More

युवा फोरम भारत संस्थेची जिल्हा कार्यकारणी जाहीर…

कुडाळ ता.१३-:युवा फोरम भारत संस्थेची जिल्हा कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली असून, कुडाळ येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे सचिव हितेश कुडाळकर, उपाध्यक्ष अमोल निकम, भूषण मेस्त्री उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्षपदी शुभम सिंदगीकर, तर महिला जिल्हाध्यक्षपदी ऋतुजा मर्गज यांची नियुक्ती करण्यात आली आहे….

Read More

विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीची भाजपा वेंगुर्ले च्या वतीने होळी

वेंगुर्ले ता.१३-:* मुंबई पोलिसांच्या सायबर विभागामार्फत फोन टॅपींग प्रकरणी मान.विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली , याचा निषेध म्हणून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने “त्या” नोटीसीची होळी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारकडून मुद्दामहुन विरोधी पक्षनेत्यांना अडचणीत आणन्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे या कृतीचा निषेध म्हणून नोटीसीचे दहन भाजपा च्या वतीने तालुका कार्यालया…

Read More

कोळंब येथे महिलांचा गुणगौरव व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

मालवण ता.१३-:* श्री देव खापरेश्वर वाचनालय व ग्रंथालय, कोळंबतर्फे आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन व गुणगौरव कार्यक्रम कोळंब येथील श्री समर्थ मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, वकील प्रतिभा जामदार, सीया धुरी, दीपा फाटक, स्वाती सावंत, एकता ढोलम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चारुशीला देऊलकर, प्रतिमा भोजने, प्रतिभा जामदार, दर्शना…

Read More

खारेपाटण हायस्कुलमध्ये दहावी विद्यर्थ्यांचा सदिच्छा समारंभ

कणकवली 13 मार्च (प्रतिनिधी)- खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कुल मधील इयत्ता १० वी च्या विद्यर्थ्यांचा शुभेच्छा तथा सदिच्छा समारंभ नुकताच संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच सम्पन्न झाला. या कार्यक्रमाला राजापूर तालुक्याचे चार्टर्ड अकाँउटर (CA) सिद्धेश अनिल करंगुटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तर संस्थेचे…

Read More

मुलांच्या भावनिक गरजांचा विचार करा – मधुरा आजगांवकर

वेंगुर्ला ता.१३-:* आपल्या अपेक्षा पालकांनी मुलांवर न लादता मुलांच्या भावनिक गरजा काय आहेत याचा विचार करणे फार गरजेचे आहे. अशावेळी समुपदेशकाची निवड करुन योग्य ते मार्गदर्शन घ्यावे असे प्रतिपादन पुणे येथील मल्टीनॅशनल कंपनीत एच.आर.म्हणून कार्यरत असलेल्या वेंगुर्ल्याच्या सुकन्या मधुरा आजगांवकर हिने केले. वेंगुर्ला येथील मुक्तांगण महिला मंचातर्फे दरवर्षी भाषादिन, महिलादिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे आयोजन…

Read More

काळाची पावले ओळखून महिलानी सर्व क्षेत्रात प्रगती करावी:सौ.उर्मिला यादव

कणकवली ता.१३-:* बदलत्या काळाची पावले ओळखून आत्ताच्या तरुण मुलीनी व महिलानी राजकारणासह सहकार क्षेत्रात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे असे प्रतिपादन जागतिक महिला दिनानिमित्त बोलताना केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लावण्यसिंधु लोककला व चित्रपट सहकारी संस्थेतर्फे कणकवली येथे महिला दिन कार्यक्रम येथील श्री भवानी सभागृहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी संस्थेने आतापर्यंत…

Read More

सावडाव भाजपाचे बूथ अध्यक्ष अशोक वारंग यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

कणकवली ता.१३-:* कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील भाजपाचे बूथ अध्यक्ष अशोक विठोबा वारंग यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विभागप्रमुख अरविंद राणे, उपविभागप्रमुख व्यकंटेश वारंग, दामू सावंत, शाखाप्रमुख संदीप वारंग, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू दुखंडे, जयवंत वारंग, विजय कदम, किशोर आचरेकर व…

Read More

माणगाव येथे अभिनय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी ता.१३–:* श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय, माणगाव येथे एकपात्री अभिनय स्पर्धा झाल्या. माणगाव पंचक्रोशीतील विविध शाळेतील ३५ स्पर्धकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. तीन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे परीक्षण नाट्यर्मी पांडुरंग कोंडोसकर व डाॅ. दत्ता शिरसाट यांनी केले. तिसरी ते चौथीच्या गटात प्रथम क्रमांक कुमारी वैभवी अमित मुंज, द्वितीय सिद्धी सुधीर गावडे, तृतिय प्रांजली संजिव…

Read More
You cannot copy content of this page