कणकवली ता.१३-:* कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील भाजपाचे बूथ अध्यक्ष अशोक विठोबा वारंग यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विभागप्रमुख अरविंद राणे, उपविभागप्रमुख व्यकंटेश वारंग, दामू सावंत, शाखाप्रमुख संदीप वारंग, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू दुखंडे, जयवंत वारंग, विजय कदम, किशोर आचरेकर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रकाश काटे, एकनाथ वारंग, अभिजित वारंग, श्रीपद जाधव, प्रदीप जाधव, महेश जाधव, गुरुप्रसाद कांबळे, सीताराम खंदारे, विनायक लोके या प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य ग्रामस्थांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले.
