सावंतवाडी विठ्ठल मंदिरात १० एप्रिलला रामनवमी उत्सव

सावंतवाडी ता6: येथील श्री देव विठ्ठल मंदिर येथे प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी देखील रविवार 10 एप्रिल रोजी रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे या उत्साहात मोठ्या प्रमाणात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रामनवमी निमित्त सकाळी १० वा सौ. ललिन तेली यांचे किर्तन, दुपारी १२.०० वा. रामजन्म, नामस्मरण , सायं. ६.०० वा. भक्ती गीतांचा कार्यक्रम…

Read More

कणकवली येथिल शिंदे निवास ते एस एम हायस्कुल मार्ग मोकळा

नगराध्यक्ष समिर नलावडे व बंडू हर्णे यांचे टेंबवाडी रहिवाशांनी मानले आभार कणकवली ता.०६-:* कणकवली शहरातील टेंबवाडी प्रभागातील शिंदे घर ते एस एम हायस्कूलकडे जाणारा मार्ग अनेक वर्ष प्रलंबित होता. त्यामुळे नागरिकांची अनेक वर्ष गैरसोय होत होती, त्यामुळे आज हा रस्ता मोकळा झाला आहे, त्यामुळे विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, सदर मार्गासाठी लागणारा भूखंड त्या मार्गातील…

Read More

डिंगणेत विजेचा लोळ कोसळल्याने घराच्या छपराचे व भिंतीचे नुकसान

बांदा ता.०६-:* डिंगणे-आंबेडकरनगर येथील प्रिया रामदास डिंगणेकर यांच्या घरावर काल मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसात विजेचा लोळ कोसळल्याने घराच्या छपराचे व भिंतीचे नुकसान झाले. सुदैवाने डिंगणेकर कुटुंबीय यातून बचावले. काल बांदा दशक्रोशीला मुसळधार अवकाळी पावसाचा फटका बसला. सायंकाळी उशिरा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. रात्री उशिरा डिंगणेकर कुटुंबियांच्या घरावर अचानक वीज कोसळली. वीज छपराच्या पत्र्यातून आत भिंतीवर…

Read More

मोबदला द्या आणि तात्काळ हायवेची बंद लेन सुरू करा

वागदे माजी सरपंच संदीप सावंत यांच्यासह ग्रामस्थांची मागणी कणकवली ता.०६-:* वागदे येथील भूधारक यांनाही त्यांच्या नोटीशीतील नमुद मोबदल्यानुसार सदरची रक्कम पुढील 10 दिवसात मिळावी व त्यानंतर लगेचच सदरची बंद असलेली एका बाजूची हायवे लेन काम पूर्ण करून वाहतूकीस मोकळी करावी . अशी मागणी वागदे माजी सरपंच संदीप सावंत यांच्यासह ग्रामस्थानी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे….

Read More

श्रद्धा पाटकर यांनी कणकवली बाजारपेठेत राबवला पाणपोई उपक्रम

कणकवली ता.०६-:* रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित “तृष्णा पाणपोई” हा उपक्रम कणकवली येथील मंगळवार आठवडी बाजारात राबविण्यात आला. या उपक्रमांमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षा श्रद्धा पाटकर तसेच पांडुरंग पारकर, नमिता घाडीगावकर, निखील पांगम, सुजय जाधव, साक्षी चव्हाण , नम्रता गांवकर व इतर रोटरॅक्टर सहभागी झाले होते. या उपक्रमा दरम्यान सर्व रोटरॅक्टर्सना चांगले…

Read More

टीसींच्या सतर्कतेमुळे रेल्वेतील चोरटा जाळ्यात

मांडवी एक्स्प्रेसमधील प्रकार : सहा मोबाईलसह बॅग जप्त, दोघांकडे सुपूर्त सावंतवाडी, ता. ६ : मडगाव-सीएसटी मांडवी एक्सप्रेसमध्ये आज चोरट्याला रंगेहाथ पकडण्यात आले. कोकण रेल्वेतील टिसी प्रविण लोके, मंगेश साळवी, मिलिंद राणे यांच्या सतर्कतेमुळे चोरट्याला पकडण्यात यश आले असून त्यांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील तक्रारदार जगदेव सिंग व सोहेल पठाण यांना त्यांची रोख रक्कम…

Read More

नागरिकांचा विचार करूनच मोती तलावातील गाळ काढा

राघवेंद्र नार्वेकर : उन्हाळा असल्याने पाणी टंचाईची भीती सावंतवाडी ता.०६-:* येथील मोती तलावातील गाळ काढण्यासाठी सावंतवाडी शहर काँग्रेसचा पाठिंबा आहे; मात्र उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई उदभूव शकते. त्यामुळे नियोजन करून गाळ काढावा अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर यांनी आज पालिका बैठकीत मांडली. मोती तलावातील गाळ काढण्यास काँग्रेसचा सहभाग पण असेल, मात्र केवळ कोणाचा अर्ज…

Read More

बैल झुंजी विषया वरून वेंगुर्ला पोलीस ठाण्यात पार पडली पोलिस पाटील यांची बैठक

पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांनी केले मार्गदर्शन वेंगुर्ला ता.०६-:* वेंगुर्ले तालुक्यात बैल झुंजी सारखे प्रकार आपल्या गावामध्ये घडत असल्यास त्याची कल्पना पोलिसांना तात्काळ पोलिस पाटील यांनी द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी आजच्या बैठकीत केले. चार दिवसांपूर्वी बैल झुंजीमध्ये मालवण येथे बाबु नावाच्या बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र लोकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याच पहायला…

Read More

विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होताच करिअरच्या अनेक संधी : प्रा. सेन

मालवण ता.०६-:* ‘विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर करिअरच्या अनेक संधी आहेत. त्या जाणून घेऊन आपली आवड कशात आहे, याचा विचार करून मार्गक्रमण करा, तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन प्रा. प्रतीक्षा सेन यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे ‘विज्ञान विषयातून पदवीनंतर करिअरच्या संधी’ या विषयावर नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आभासी…

Read More

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे

शिवसेनेतर्फे हरी खोबरेकर यांची मागणी मालवण ता.०६-:* मालवण तालुक्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मच्छीमार व शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून त्वरित पंचनामे करावे अशी मागणी मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख आणि जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी मालवण तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन तालुकाप्रमुख हरी…

Read More
You cannot copy content of this page