मोबदला द्या आणि तात्काळ हायवेची बंद लेन सुरू करा

वागदे माजी सरपंच संदीप सावंत यांच्यासह ग्रामस्थांची मागणी

कणकवली ता.०६-:* वागदे येथील भूधारक यांनाही त्यांच्या नोटीशीतील नमुद मोबदल्यानुसार सदरची रक्कम पुढील 10 दिवसात मिळावी व त्यानंतर लगेचच सदरची बंद असलेली एका बाजूची हायवे लेन काम पूर्ण करून वाहतूकीस मोकळी करावी . अशी मागणी वागदे माजी सरपंच संदीप सावंत यांच्यासह ग्रामस्थानी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यामुळे जेणेकरून होत असलेले अपघात थांबतील तरी सदर पत्राचा सहानुभूतीपूर्वक विचार करून यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे. सध्या वागदे येथे हायवेच्या एका बाजूची लेन ही पूर्णपणे वाहतूकीस बंद आहे . सदर लेनच्या भूधारकांना प्रथम जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात कोणतीही नोटीसही नव्हती . परंतु आता 17 फेब्रुवारी 2022 अन्वये सदरची नोटीस संबंधित भूधारकांना प्राप्त झालेली आहे . याबाबत संबंधितास मोबदला तात्काळ देण्यात येईल असे सांगण्यात आलेले होते .

परंतू सदर नोटीशीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष मोबदला अदयाप मिळालेला नाही . सध्या मौजे वागदे येथील सदर हायवेच्या एका बाजूची लेन बंद असल्याने गेल्या दोन वर्षात सदर भागात मोठया प्रमाणात अपघातही झालेले आहेत . त्यामुळे प्रामुख्याने विशेष बाब म्हणून सदर बंद असलेल्या लेनच्या भागाचा सर्व्हे क्र 19 अ 1 / अ 2 सखाराम बाबाजी घाडीगांवकर व इतर अनुषंगीक नोटीस मिळालेले भूधारक यांनाही त्यांच्या नोटीशीतील नमुद मोबदल्यानुसार सदरची रक्कम पुढील 10 दिवसात मिळावी व त्यानंतर लगेचच सदरची बंद असलेली एका बाजूची हायवे लेन काम पूर्ण करून वाहतूकीस मोकळी करावी . अशी मागणी माजी सरपंच संदीप सावंत यांच्यासह ग्रामस्थानी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page