राघवेंद्र नार्वेकर : उन्हाळा असल्याने पाणी टंचाईची भीती
सावंतवाडी ता.०६-:* येथील मोती तलावातील गाळ काढण्यासाठी सावंतवाडी शहर काँग्रेसचा पाठिंबा आहे; मात्र उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई उदभूव शकते. त्यामुळे नियोजन करून गाळ काढावा अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर यांनी आज पालिका बैठकीत मांडली. मोती तलावातील गाळ काढण्यास काँग्रेसचा सहभाग पण असेल, मात्र केवळ कोणाचा अर्ज किंवा निवेदन आले म्हणून सारासार विचार न करता घाईगडबडीने कोणताही उपक्रम राबवू नये.
तसेच सद्य स्थितीत उन्हाळा सुरू असून उन्हाळ्याच्या तोंडावर पूर्ण तलावातील गाळ काढण्यासाठी पाणी ड्रेन केल्यास विहिरीच्या पाण्याची पातळी खाली जाऊन शहरात पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे पूर्व नियोजन करूनच स्केच काढून एरिया आयडेंटिफाय करून, खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून नळाच्या पाण्याचा टाइमिंग वाढवून तलावातील एका भागाचा गाळ काढण्यात यावा अशी भूमिकाही काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे.
