Headlines

मालवणात ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता संवाद’ कार्यक्रम संपन्न…

⚡मालवण ता.१५-:हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता संवाद’ कार्यक्रम मालवण येथे उत्साहात संपन्न झाला. राष्ट्र व धर्मकार्यात अधिवक्त्यांचे योगदान या विषयावर आयोजित या संवाद कार्यक्रमाला अधिवक्ता व राष्ट्रहिताची भावना असलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण रेवतळे येथील हॉटेल विसावा येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री. रमेश शिंदे यांनी…

Read Full News

राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेअंतर्गत ३२ कलाकारांना मंजुरी पत्रांचे वितरण…

⚡कणकवली ता.१४-: राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली व वैभववाडी तालुक्यातील ३२ पात्र कलाकारांना मानधन मंजुरी पत्रांचे वितरण पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी कलाकार मानधन समितीचे सदस्य संतोष (बुवा) कानडे व रितेश सुतार यांनी उपस्थित…

Read Full News

बांद्यात रक्तदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ३० रक्तदात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी…

⚡बांदा ता.१४-: रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते. रक्ताचा साठा उपलब्ध राहण्यासाठी समाजातील प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. रक्तदान हेच सर्वोच्च समाजसेवेचे कार्य असून अशा उपक्रमांमुळे समाजात मानवतेची भावना अधिक दृढ होते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी येथे केले.जागतिक रक्तदाता दिनानिमित्त बांदा येथील आनंदी मंगल कार्यालयात आयोजित भव्य रक्तदान…

Read Full News

आडी येथे श्रीदत्तयाग सोहळ्याचा भक्तिमय प्रारंभ; मनशुद्धी आणि आत्मविकासाचा संकल्प करा…

परमात्मराज महाराज:”शरीर कुठेही असो, मन अध्यात्माच्या दिशेने असावे”; दत्तयागात हजारो भाविकांचा श्रद्धेने सहभाग.. ⚡बांदा ता.१४-: आध्यात्मिक सोहळ्यामध्ये बसण्याच्या स्थानापेक्षाही मनःपूर्वक सहभाग घेणे अधिक महत्त्वाचे आहे. शरीर कुठेही असो, परंतु मन नेहमी अध्यात्माच्या दिशेने आणि उन्नतीकडे असले पाहिजे, मनातील वाईट विचार, अहंकार, मत्सर आणि नकारात्मकता यांचा यज्ञाग्नीत त्याग करून आत्मविकासाचा संकल्प करावा, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन…

अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही संपन्न.. ⚡​सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पालिकेच्या वतीने करण्यात आले होते. यात सावंतवाडी नगर परिषदेच्या नरेंद्र डोंगर येथील जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.यासोबतच…

Read Full News

ऐतिहासिक ​सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार…

ना. नितेश राणे:खोचक टीकेकडे दुर्लक्ष करा व आपली ‘रेघ’ मोठी करा,लाड-पागे समितीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेच्या २७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप.. ⚡​सावंतवाडी ता.१४-:कोकणच्या विकासाला प्राधान्य देणारा मी असल्याने निवडणूक बिनविरोध करत आचारसंहिता उचलून टाकली. कोकणात जास्त काळ आचारसंहिता लागणे फायद्याचे नाही. येथील विकासासाठी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावसामुळे केवळ ७ महिने आपल्या हातात मिळतात. यामुळे काहीवेळा निधी अखर्चित…

Read Full News

तेंडोलीत उद्या संयुक्त दशावतार नाटक….

⚡कुडाळ ता.१४-: तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने तेंडोली येथील श्री देव रवळनाथ पंचायतन येथे 15 जून रोजी रात्री 7.30 वाजता ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ हे काल्पनिक संयुक्त दशावतार नाटक होणार आहे. यात निवडक कलाकारांचा समावेश आहे.यात महागणपती-प्रथमेश मेस्त्री, रिद्धी सिध्दी-सखाराम परब, चंडोल-दामोदर जोशी,आई-सुधीर तांडेल, श्याम-हरिश्चंद्र गांवकर,नवरा- काका कलिंगण, सुंदर-गिरिश राऊळ, कुंदन- संजय पाटील,राजा- संजय वालावलकर,शुभांगी-नितीन घाडी,आचार्य-दशावतारातील भिष्माचार्य यशवंत…

Read Full News

नाट्यगृहाला निधी दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे विलास कुडाळकर यांनी मानले आभार…

⚡कुडाळ ता.१४-: कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेला प्रकल्प म्हणजे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाला आमदार निलेश राणे यांनी १० कोटी एवढा निधी मंजूर करून आणल्यामुळे हे नाट्यगृह सुसज्ज आणि नाट्यप्रेमींसाठी उपयुक्त असे ठरणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी आभार मानले आहेत.मालवणी भाषा साता समुद्रापलीकडे घेऊन जाणारे आणि आपल्या भाषेचा…

Read Full News

तालुका स्कुल आणि कन्या शाळा इमारत दुरुस्ती करा…

अभिषेक गावडे यांची बांधकाम सभापतींकडे मागणी.. कुडाळ : कुडाळ शहरातील तालुका स्कूल व कन्या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांना निवेदन दिले. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत.कुडाळ शहरातील तालुका स्कूलमध्ये सभा मंडपाची आवश्यकता आहे. तसेच त्या ठिकाणी असलेल्या…

Read Full News

आयुष हॉस्पिटलसाठी दोडामार्ग-धारगळ कदंबा बससेवा सुरू करण्याची भाजपाची मागणी…

⚡दोडामार्ग ता.१४-: तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांचा विचार करून दोडामार्ग ते धारगळ येथील आयुष हॉस्पिटलदरम्यान नियमित कदंबा बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी दोडामार्ग भाजपाच्या शिष्टमंडळाने डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांच्याकडे केली.दोडामार्ग तालुक्यातील अनेक रुग्ण विविध आजारांच्या तपासणी व उपचारांसाठी धारगळ येथील आयुष हॉस्पिटलमध्ये नियमितपणे जात असतात. मात्र, दोडामार्ग ते धारगळ या मार्गावर थेट…

Read Full News

You cannot copy content of this page