Headlines

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करा

नगरसेवक अबीद नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची धडक ⚡कणकवली ता.०९-: राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केलेल्या मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते…

Read More

नमसवाडी ब्राह्मणाचा जत्रोत्सव ११ रोजी

⚡वेंगुर्ला ता.०९-: उभादांडा-नमसवाडी येथील श्रीदेव ब्राह्मणाचा जत्रौत्सव शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त केळी-नारळ ठेवणे, रात्रौ नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. जत्रौत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

Read More

माजी विद्यार्थी व्हॉटस् अॅप ग्रुपचे गेट टुगेदर संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०९-: – येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. या व्हॉटस् अॅप ग्रुपचे गेट टु गेदर ८ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयात संपन्न झाले. सुरुवातीला बॅ.खर्डेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Read More

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाच्या निवड चाचणीला जिल्ह्यातून प्रतिसाद

⚡वेंगुर्ला ता.०९-: माजी विद्यार्थी संघ-न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, अभिनव फाऊंडेशन -सावंतवाडी आणि किरात ट्रस्ट, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाकरिता निवड चाचणी लेखी परीक्षा ८ नोव्हेंबर रोजी बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात संपन्न झाली. या परीक्षेकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

Read More

तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.०९-: सिधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व नगरवाचनालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ला तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन केले आहे.

Read More

गुन्ह्यांची उकल करण्यावर राहणार भर

नूतन पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी केला इरादा स्पष्ट;मुख्यालय पत्रकार संघाने भेट घेत दिल्या शुभेच्छा ओरोस ता.०९-: जिल्ह्यात होत असलेल्या चोऱ्या, उफाळलेले अवैध धंदे तसेच गुंगीचे औषध देवून प्रवाशांना लुटण्याचे घडलेले याबाबत पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी बोलताना पुढील क्राईम सभेत आपण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेशी याबाबत चर्चा करणार आहे. मात्र, गुन्हे रोखण्यासाठी घडलेल्या गुन्ह्याची उकल करणे…

Read More

घोटगे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत मणेरी स्वराभिषेक मंडळ प्रथम

⚡दोडामार्ग ता.०९-: घोटगे येथील हरिनाम सप्ताह निमित्त आयोजीत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. घोटगेत सलग 18 वर्षे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय किवा खुली भजन स्पर्धेच आयोजन श्री देवी सातेरी मंदिरात केले जाते.यावर्षी जिल्ह्यस्तरीय भजन स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत 11 भजन मंडळानी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे उदगाटन दोडामार्ग पोलिस उप-निरीक्षक जयेश ठाकुर यांच्या हस्ते…

Read More

संजय राऊत इज बॅक,

जामीन अर्ज अखेर मंजूर ⚡मुंबई, दि.०९-: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये  प्रविण राऊत आणि  संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे.  संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा…

Read More

शहरातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वेधले प्रांताधिकाऱ्यांचे लक्ष*

⚡सावंतवाडी ता.०९-: शहरातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी तथा सावंतवाडी नगरपालिकेचे प्रशासक यांचे वेधले लक्ष. सावंतवाडी शहरातील मोठ्या दिमाखात उद्घाटन होऊन देखील बंद अवस्थेत असलेले स्विमिंग पूल ,इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅरिस्टर नाथपई हॉल ,आता लग्नसराई सुरू होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात हॉल उपलब्ध होण्याच्या उद्देशाने हॉलचे काम लवकरात लवकर पूर्ण करून…

Read More

“सारेच पुरुष नसतात बदनाम” काव्यसंग्रहाचे सावंतवाडीत प्रकाशन

सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील १९ कवयित्रींच्या कवितांचा सहभाग ⚡कणकवली ता.०९-: सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील १९ कवयित्रींच्या कवितांचा सहभाग असलेला आणि कवी अजय कांडर, वैभव साटम आणि मधुकर मातोंडकर यांनी संपादित केलेल्या “सारे पुरुष नसतात बदनाम” या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार १२ नोव्हेंबर रोजी सायं. ५.३०वा. श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या समाज साहित्य संमेलनात संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या…

Read More
You cannot copy content of this page