नूतन पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी केला इरादा स्पष्ट;मुख्यालय पत्रकार संघाने भेट घेत दिल्या शुभेच्छा
ओरोस ता.०९-:
जिल्ह्यात होत असलेल्या चोऱ्या, उफाळलेले अवैध धंदे तसेच गुंगीचे औषध देवून प्रवाशांना लुटण्याचे घडलेले याबाबत पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी बोलताना पुढील क्राईम सभेत आपण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेशी याबाबत चर्चा करणार आहे. मात्र, गुन्हे रोखण्यासाठी घडलेल्या गुन्ह्याची उकल करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगत आपल्या काळात गुन्ह्यांतील आरोपींना जेरबंद करण्यावर भर राहणार असल्याचा इरादा स्पष्ट केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारल्या नंतर प्रथमच मुख्यालय पत्रकार संघाने सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष संजय वालावलकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपकर, सचिव देवयानी वरसकर, मुख्यालय सचिव मनोज वारंग, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, संदीप गावडे, दत्तप्रसाद वालावलकर, प्रसाद पाताडे, विनोद परब, गुरुप्रसाद दळवी आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी अग्रवाल यांनी जिल्ह्यातील क्राईम बाबत पत्रकारांकडून माहिती जाणून घेतली.
